Home » Blog » train hit school bus: रेल्वेची स्कूलबसला धडक; तीन शळकरी मुलांचा मृत्यू

train hit school bus: रेल्वेची स्कूलबसला धडक; तीन शळकरी मुलांचा मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
train hit school bus

कुड्डालोर  (तिरूचिरापल्ली) : रेल्वेच्या मानवयुक्त गेटवर स्कूल बसला रेल्वेने दिलेल्या धडकेत तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी (८ जुलै) सकाळी ७.४५ वाजता कुड्डालोर जिल्ह्यातील सेम्मनकुप्पम येथे घडली. या दुर्घटनेत चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. (train hit school bus)

कुड्डालोर आणि अलप्पक्कम दरम्यान कृष्णस्वामी विद्यानिकेतन या खाजगी सीबीएसई शाळेच्या बसचालकाने रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १७० (एक नॉन-इंटरलॉक्ड मानवयुक्त गेट) ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आलेल्या विल्लुपुरम-मयिलादुथुराई पॅसेंजर ट्रेनने (५६८१३) तिला धडक दिली. आणखी एक विद्यार्थी जखमी झाला आहे. त्याला कुड्डालोरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(train hit school bus)

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पंकज शर्मा गेटकीपरचे नाव आहे. तो झोपेत होता. त्यामुळे त्याने गेट बंद केले नव्हते. या दुर्घटनेनंतर संतप्त जमावाने गेटकीपरलाही मारहाण केली. तथापि, शर्मा गेट बंद करत असताना, बसचालकानेच जबरदस्तीने गेट ओलांडू देण्याचा आग्रह धरला, असे अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.(train hit school bus)

दरम्यान, दक्षिण रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जिथे अपघात झाला लेव्हल क्रॉसिंग गेटवर अंडरपास मंजूर करण्यात आला आहे. शिवाय त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे, परंतु गेल्या एक वर्षापासून (कुड्डालोर) जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी परवानगी दिलेली नाही.

एएमएमकेचे सरचिटणीस टी.टी.व्ही. दिनकरन म्हणाले की, गेटकीपरबद्दल जनतेच्या काही तक्रारी लक्षात घेता, अशा अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने खबरदारीचे उपाय करायला हवेत.

हेही वाचा :
मीरा भाईंदर मोर्चात मराठी माणसांची धरपकड

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00