Home » Blog » Yoga Day: देवेंद्रजी योगीच  : अमृता फडणवीस

Yoga Day: देवेंद्रजी योगीच  : अमृता फडणवीस

by प्रतिनिधी
0 comments
Yoga Day

मुंबई : विशेष प्रतिनिधी : देवेंद्रजी हे योगीच आहेत. ते कधीच कसरत करत नाहीत, पण ध्यान-धारणा करत असतात, असे त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या. (Yoga Day)

आंतरराष्ट्रीय योग दिन महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका स्वयंसेवी संस्थेने आयोजिलेल्या योग शिबिरात सहभागी झाल्या होत्या. मुंबई महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योगासने केली. अमृता फडणवीस यांनी योगाचे महत्व अधोरेखित केले. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘देवेंद्रजी हे योगीच आहेत. ते कधीच कसरत करत नाही. पण ध्यान धारणा नियमित करत असतात’ असे सांगून त्यांनी योगासने ही फार महत्वाची असल्याचे सांगितले. (Yoga Day)

मुख्यमंत्र्यांची पुण्यात वारकऱ्यांसोबत योगासने

जागतिक योगदिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी, विद्यार्थी आणि पुणेकरांनी योगासने केली. आम्ही आज वारकऱ्यांसह योगासने केली, पुण्यातली कॉलेजेसही यात सहभागी झाल्याने भव्य कार्यक्रम झाला. प्राचीन संस्कृती, जीवन पद्धती, चिकित्सा पद्धती, ज्यात फक्त शरीराचा विचार केलेला नाही, मनाचाही विचार केला आहे. ती क्षमता योगात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे योगविद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. (Yoga Day)

राज्यात शांतताप्रिय पक्ष सत्तेत
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ‘कमॉन किल मी,’अशा शब्दात आव्हान दिले होते. त्याबाबत विचारणा केली असता अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘आज आंतरराष्ट्रीय योगादिन आहे त्यामुळे सर्वांनी आनंदात राहिले पाहिजे, आपला देश हा शांतताप्रिय आहे, राज्यात शांतताप्रिय पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे कोणीही आक्रमक, वादग्रस्त भाषा वापरणे योग्य नाही, असा टोला लागवला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00