खरगोन, मध्यप्रदेश : कुर्बानीसाठी हैद्राबादकडे बकरी भरुन निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये ५० बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी क्लिनरचा हॉस्पिटलमध्ये उपचारास नेत असताना मृत्यू झाला. अपघातानंतर बकरी लुटण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी झुंबड उडाली होती. ही घटना मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील मेनगाव येथे झाली.
मेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंकज तिवारी यांनी अपघाताची माहिती दिली. सोमवारी खरसोन-कसरावद रोडवर मोठा अपघात झाला. ओव्हरटेक करताना बकऱ्यांनी भरलेला ट्रकने सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. सिमेंटचा ट्रक नादुरुस्त झाला होता. तो रस्त्याच्या कडेला उभा होता. त्या ट्रकवर बकरी वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकमध्ये १८० बकऱ्या कोंबल्या होत्या. जागेवरच ६० बकरी खलास झाली. बकऱ्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण पुढे आले आहे. अपघाताचे वृत्त घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली. ग्रामस्थांनी जीवंत आणि मृत बकरी पळवून नेल्या.
क्लिनरचा मृत्यू
ट्रकचा क्लिनर सादिर कुरेशी अपघातात गंभीर जखमी झाला. इंदोर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कुरेशी हे इंदोरचे रहिवासी आहेत. ट्रकचालक सईद किरकोळ जखमी झाला आहे. त्याने माहिती दिली की बकरी ईदसाठी कुर्बानी दिली जाते. नीमचहून हा ट्रक हैद्राबादला निघाला होता. ट्रक मालक आणि चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.