Home » Blog » Giroli Bribe : २५ हजाराची लाच मागणाऱ्या तलाठ्याला अटक

Giroli Bribe : २५ हजाराची लाच मागणाऱ्या तलाठ्याला अटक

by प्रतिनिधी
0 comments
Giroli Bribe

कोल्हापूर : प्रतिनिधी : विना परवाना रस्ता करताना जप्त केलेला जेसीबी परत देण्यासाठी २५ हजाराची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रमेश मुरलीधर वळीवडेकर (रा. उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे लाच मागणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. (Giroli Bribe)

तक्रारदारांना त्यांच्या पन्हाळा तालुक्यातील गिरोली गावातील शेतात बोअर मारायचे होते. बोअर शेतात रुतू नये यासाठी शेताकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी जेसीबी मागवण्यात आला. तात्पुरता रस्ता तयार करण्यासाठी जेसीबीने खडी पसरत असताना जोतिबा येथील तलाठी रमेश वळीवडेकर घटनास्थळी आले. परवानगी न घेता काम का करता असा जाब विचारुन त्यांनी जेसीबी ताब्यात घेतला. पुढील कारवाई टाळण्यासाठी आणि जेसीबी सोडवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. (Giroli Bribe)

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी तक्रारदाराच्या तक्रारीची खातरजमा केली असता तलाठी वळीवडेकर यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली चौकशीत दिसून आले.  त्यानंतर २५ हजार रक्कमेवर लाचेसाठी तडजोड झाल्याचे निष्पण्ण झाले. त्यानंतर पोलिसांनी तलाठी रमेश वळीवडेकर याच्याविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंके, सहाय्यक फौजदार सुनील मोरे, हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, पोलिस नाईक सुधीर पाटील, संदीप पवार, गजानन कुराडे यांनी कारवाईत भाग घेतला. (Giroli Bribe)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00