Home » Blog » Dr. jogalekar : ख्यातनाम नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अतुल जोगळेकर यांचे निधन

Dr. jogalekar : ख्यातनाम नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अतुल जोगळेकर यांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
Dr. jogalekar passes away

कोल्हापूर : प्रतिनिधी : ख्यातनाम नेत्ररोग तज्ञ डॉ. अतुल मधुकर जोगळेकर यांचे सोमवारी २६ मे राजारामपुरी येथील राहत्या घरी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ७९ वर्ष होते. त्यांच्या मागे पत्नी डॉ. वसुधा, मुलगा डॉ. मंदार, सून डॉ. विभावरी, मुलगी अपर्णा साठे, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (Dr. jogalekar)

डॉ. अतुल जोगळेकर यांनी २५ नोव्हेंबर १९७३ रोजी राजारामपुरी नववी गल्ली येथे प्रगती नेत्र रुग्णालयाची सुरुवात केली. पणजोबा, आजोबा व वडील यांच्याकडून चालत आलेला वैद्यकीय सेवेचा वारसा डॉ. अतुल जोगळेकर यांनी प्रगती नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून चौथ्या पिढीतही जपला. कोल्हापुरात अत्याधुनिक नेत्रउपचाराचा पाया डॉ. जोगळेकर यांनी घातला. सतत नवीन कौशल्य व प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला. समाजसेवेची उपजत आवड असल्याने ते रोटरी मिडटाऊन क्लब व इतर समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून महिन्यातून दोन वेळा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेत. १९७५ ते १९९० अशी पंधरा वर्षे सलग त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला होता. (Dr. jogalekar)

१९८० ते २००० या कालावधीत पंचगंगा हॉस्पिटलमध्ये आठवड्यातून दोन दिवस डॉ. जोगळेकर यांनी हजारो नेत्ररुग्णांना मोफत सेवा दिली. १९८८ ते २०१८ या कालावधीत डॉ. जोगळेकर यांनी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मानद प्रोफेसर म्हणून काम केले. दक्षिण महाराष्ट्रातील पहिले आय. ओ.ओ.एल इम्प्लांट तंत्र व कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक सुरू करण्याचा मान डॉ. जोगळेकर यांच्याकडे जातो. आय.एस.ओ. मानांकन, ओ.सी.टी. स्कॅन आणि नॅवेक्स ईसी ५००० हे तंत्रज्ञान ही प्रगती नेत्र रुग्णालयाची वैशिष्ट्ये डॉ. जोगळेकर यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारी आहेत.
२०१९ मध्ये या रुग्णालयाला एनएबीएच मानांकनही मिळाले. २०११ मध्ये हॉस्पिटलचे सुपर स्पेशालिटी आय केअर हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले. ते शेवटपर्यंत हॉस्पिटलमध्ये नेत्ररुग्णांच्या सेवेत कार्यरत होते. नेत्ररुग्णांना अत्याधुनिक सेवा पुरवणे हा जीवन ध्यास असणाऱ्या डॉ. जोगळेकरांच्या निधनाने नेत्र रुग्णांसाठी गेली बावन्न वर्ष कार्यरत असणारा नंदादीप मालवल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा :
मुंबई, बारामती, कोकणाला पावसाने झोडपले
नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00