Home » Blog » Bhamin samaj Morcha: जानवे काढायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

Bhamin samaj Morcha: जानवे काढायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

ब्राह्मण समाजाच्यावतीने बेळगावात भव्य मोर्चा

by प्रतिनिधी
0 comments
Bhamin samaj Morcha

बेळगाव : प्रतिनिधी : सीईटी परीक्षेवेळी जानवे काढायला लावल्याच्या निषेधार्थ सोमवारी (२१ ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयावर ब्राह्मण समाजातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.(Bhamin samaj Morcha)

सीईटी परीक्षेवेळी दावणगिरी, बिदर, शिमोगा, धारवाडसह राज्यातील विविध ठिकाणी ब्राह्मण विद्यार्थ्यांना जानवे काढायला लावण्यात आले. त्याच्या निषेधार्थ शहरातील ब्राह्मण समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात जानवे धरून  भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात  आले. (Bhamin samaj Morcha)

शहरातील ब्राह्मण समाजातर्फे कृष्ण मठाचे श्रीनिवास होन्नीदिब्ब आचार्य, जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे, ॲड. एस. एम. कुलकर्णी, आर. एस. मुतालिक आदींच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी कन्नड साहित्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद तसेच बेळगाव शहर परिसरातील विविध ब्राह्मण व हिंदू संघटनांसह ब्राह्मण समाजाचे शेकडो स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. र मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोहोचताच उपस्थित ब्राह्मण बंधू-भगिनींनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.  ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या गळ्यातून जानवे लावण्याच्या कृतीबद्दल यावेळी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांना जानवे काढावयास लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

ब्राह्मण समाजाच्या वतीने श्रीनिवास होन्नीदिब्ब आचार्य, आमदार अभय पाटील, राम भंडारे, ॲड. एस. एम. कुलकर्णी आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी रोशन यांनी निवेदन स्वीकारले. योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. संबंधित ब्राह्मण विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या अभियांत्रिकी वगैरे शाखेत प्रवेश देऊन न्याय द्यावा. त्याचप्रमाणे जानवे काढावयास लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा येत्या काळात राज्यव्यापी उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा :
पोलिस अधिकारी बिद्रेंच्या खुनाच्या गुन्ह्यात कुरुंदकरला जन्मठेप
कुरूंदकरने वूडकटरने केले होते अश्विनींच्या मृतदेहाचे तुकडे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00