Home » Blog » Ashwini Bidre : पोलिस अधिकारी बिद्रेंच्या खुनाच्या गुन्ह्यात कुरुंदकरला जन्मठेप

Ashwini Bidre : पोलिस अधिकारी बिद्रेंच्या खुनाच्या गुन्ह्यात कुरुंदकरला जन्मठेप

अश्विनी बिद्रे खून खटला

by प्रतिनिधी
0 comments
Ashwini Bidre

पनवेल : प्रतिनिधी : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला आज सोमवारी पनवेल सत्र न्यायाधीक्ष क.प.पालदेवार यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाचा निकाल देताना ही हत्या क्रूर आणि अमानवी स्वरुपाची होती असे म्हटले आहे.  खुनाच्या गुन्ह्यात मदत करणाऱ्या आरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रें यांचा खून करुन वूडकटरने मृतदेहाचे तुकडे करुन लोखंडी पेटीत भरुन खाडीत फेकून दिले होते. या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. (Ashwini Bidre)

आज सोमवारी सकाळी अभय कुरुंदकर आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना बंदोबस्तात पनवेल येथील सत्र न्यायालयात आणले होते. त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले. या खटल्याचा निकालासाठी बिद्रे आणि गोरे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.  न्यायालयाने निकाल देताना स्पष्टपणे नमूद केलं की, “ही हत्या क्रूर आणि अमानवी स्वरूपाची होती. एका महिला पोलिस अधिकाऱ्याशी फसवणूक करून, नंतर तिचा जीव घेण्याचे कृत्य समाजाला धक्का देणारे आहे.”. (Ashwini Bidre)

खटल्याची पार्श्वभूमी

हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील अश्विनी बिद्रे या अतिशय कष्टाने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचे पती राजू गोरे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांना एक मुलगी आहे. त्या पोलिस उप निरीक्षकपदी पोलिस दलात रुजू झाल्या. सांगली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात कर्तव्य बजावत असताना पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी कामानिमित्त संबध आला. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. बिद्रे यांची सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली. त्यांची बदली २०१३ रत्नागिरी येथे झाली. तिथेही अभय कुरुंदकर भेटायला जात होता. २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात अश्विनी बिद्रे यांची बदली झाली. १५ एप्रिल २०१६ रोजी बिद्रे यांची हत्या झाली.  ठाणे येथे अश्विनी कुरुंदकर याच्या फ्लॅटवर भेटायला गेल्या असता तिथे दोघांमध्ये वाद झाला. चिडलेल्या कुरुंदकरने लाकडी बॅटने बिद्रे यांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थंड डोक्याने अभय कुरुंदकरने वूड कटरने मृतदेहाचे तुकडे केले आणि लोखंडी पेटीमध्ये भरुन खाडीत फेकून दिले. त्यानंतर कुरुंदकर नोकरीत कार्यरत होता. (Ashwini Bidre)

अश्विनी बेपत्ता झाल्या आहेत अशी तक्रार बिद्रे-गोरे कुटुंबियांकडून पोलिस ठाण्यात दिली होती. पण पोलिस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. बिद्रे बेपत्ता होण्यामागे अभय कुरुंदकर याचा हात आहे असा आरोप बिद्रे-गोरे कुटुंबियांने केला होता.  बेपत्ता प्रकरण मिडियाच्या माध्यमातून धसास लावल्यावर अभय कुरुंदकरला अटक झाली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला अटक झाली. वरिष्ठ पोलिस अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी दबावाला बळी न पडता तपास केला आणि कोर्टात आरोपपत्र दाखल केले. कोर्टाने कुरुंदकर, फळणीकर आणि भंडारी दोषी ठरवले. कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर फळणीकर आणि भंडारीला सात वर्षाची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यातील आरोपी महेश पाटील यांची निर्दोष मुक्तता केली आहे. (Ashwini Bidre)

हेही वाचा :

पोलिस अधिकाऱ्याची राहत्या घरी हत्या

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00