Home » Blog » Sandhyamath : ‘संध्यामठ’ उपांत्य फेरीत, ‘दिलबहार’ पराभूत

Sandhyamath : ‘संध्यामठ’ उपांत्य फेरीत, ‘दिलबहार’ पराभूत

अटल चषक फुटबॉल स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Sandhyamath

कोल्हापूर : प्रतिनिधी : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाला पराभवाचा धक्का बसला. संध्यामठ तरुण मंडळाने त्यांचा १-० असा पराभव केला. या हंगामात उपांत्य फेरीत पोहोचण्याची संध्यामठ संघाची पहिली वेळ आहे. भारतीय जनता पार्टी आणि तटाकडील तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली आहे. (Sandhyamath)

छत्रपती शाहू स्टेडियवर दिलबहार तालीम मंडळ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात पहिली उपांत्यपूर्व लढत झाली. सामन्याच्या आठव्या मिनिटाला संध्यामठने धक्का दिला. कपिल शिंदेने मैदानी गोल करत संध्यामठला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी मध्यंत्तरापर्यंत टिकली. (Sandhyamath)

उत्तरार्धात परतफेड करण्यासाठी दिलबहार संघ मैदानात उतरला. त्यांनी वेगवान चढाया करत संध्यामठ संघांवर दबाव वाढविला. पण संध्यामठने भक्कम बचाव ठेवत गोल चढू दिला नाही. पूर्णवेळेत एक गोलची आघाडी कायम टिकवत संध्यामठने सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. (Sandhyamath)

सोमवारच सामना : खंडोबा तालीम मंडळ वि. सम्राटनगर स्पोर्टस्, दुपारी ४ वा.

हेही वाचा :

अनाहत, वीरला विजेतेपद

बेंगळरूची पंजाबला परतफेड

अर्जुन बाबुताचा रौप्यवेध

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00