Home » Blog » Sports award : ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे

Sports award : ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे

राज्यपाल राधाकृष्णन यांचे हस्ते शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे वितरण

by प्रतिनिधी
0 comments
Sports award

पुणे : प्रतिनिधी :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीत असून, महाराष्ट्रातील खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी सज्ज व्हावे, ’विकसित भारत’ बाबत चर्चा करत असतानाच आपण ऑलिंपिकमध्येही सर्वाधिक पदके मिळविण्याबाबतही विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या समारंभात केले. (Sports award)
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पणनमंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे  आदी मान्यवर उपस्थित होते. (Sports award)
ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे यांना आणि माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शकुंतला खटावकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने गौरवित करण्यात आले. पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेत्या आर्चर आदिती स्वामी, ओजस देवतळे  यांच्यासह राज्यातील १५९ जणांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्करांने सन्मान करण्यात आला. (Sports award)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवछत्रपतींच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार सर्वच पुरस्कार्थींचा अभिमान वाढवणारा आहे. पदकांची भरारी आपण सुरू केली आहे. राष्ट्रीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी उंचवावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चांगल्या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी आपण परदेशी पाठवतो.  पण आता त्यांच्यासोबत त्यांचे प्रशिक्षक, फिजिओ यांनाही परदेशी जाता येणार आहे. (Sports award)

राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुरस्कारार्थींच्या नावापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जोडले जाणार आहे. त्यामुळे सर्व पुरस्कारार्थींना आयुष्यभर त्याचा अभिमान वाटेल. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी करणार्‍या खेळाडूंना चांगली पारितोषिक रक्कम आणि थेट नियुक्ती देत क्रीडा क्षेत्रासाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. आभार प्रदर्शन  अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी केले. (Sports award)


पवारजी निधी देताना शिष्टचार पाळू नका – राज्यपाल राधाकृष्णन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मला शिष्टचारानुसार केवळ पाच मिनिटे बोलण्यास दिले असल्याचे सांगितले होते. हाच धागा पकडून राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणात अजित पवार जी तुम्ही तुमच्या भाषणात वेळेचा शिष्टचार पाळला. पण क्रीडा विभागाला निधी देताना कुठलाही शिष्टचार पाळू नका. अधिकाधिक निधी या विभागाला द्या. (Sports award)

हेही वाचा :

अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाखापर्यंतचे कॅशलेस उपचार

उसका जाने का समय आ गया’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00