Home » Blog » 9 indian killed : नऊ भारतीयांचा सौदी-अरेबियात मृत्यू

9 indian killed : नऊ भारतीयांचा सौदी-अरेबियात मृत्यू

जिझानजवळ झाला भीषण अपघात

by प्रतिनिधी
0 comments
9 indian killed

नवी दिल्ली : सौदी अरेबियामध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू झाला. बुधवारी जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने ही माहिती दिली. दूतावासाचे अधिकारी संबंधितांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. त्यांना आवश्यक ती मदत देण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.(9 indian killed)

भारतीय वाणिज्य दूतावासाने X वर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सौदी अरेबिया राज्याच्या पश्चिम विभागातील जिझानजवळ, एका रस्ते अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाबद्दल आम्ही तीव्र दु:ख व्यक्त करतो.’

मृतांच्या कुटुंबीयांना सर्व त्या मदतीचे आश्वासन देत, वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे, ‘पीडित कुटुंबांप्रति आमच्या संवेदना आहेत. या संकटसमयी जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावास मृतांच्या कुटुंबीयाच्या पूर्णपणे पाठीशी आहे. आम्ही तेथील अधिकारी आणि कुटुंबांच्या संपर्कात आहोत. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी आमची मनोकामना. जखमींना पुढील मदत मिळावी यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.’ (9 indian killed)

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. ‘या दुर्घटनेबद्दल आणि जीवितहानीबद्दल माहिती मिळाल्यानंतर खूप दुःख झाले.’ या दुःखद परिस्थितीत सर्वतोपरी पाठिंबा दिल्याबद्दल जेद्दाहमधील भारताच्या कौन्सुल जनरलशी त्यांनी संवाद साधला आणि कौतुक केले.

गुजरात समाचारने दिलेल्या वृत्तानुसार,  मृतांपैकी एक तेलंगणातील आहे. कपेली रमेश असे त्याचे नाव आहे. तो जगतियाल जिल्ह्यातील मेतपाली मंडल येथील रहिवासी आहे.

पीडित लोक बसमधून दक्षिणेकडील बंदर शहर जिझानमध्ये कामाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी त्यांच्या बसमध्ये २६ कामगार होते. या बसने  एका ट्रेलरला धडक दिली.  या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. त्यात नऊ भारतीयांचा समावेश आहे. उर्वरित सहा जणांमध्ये तीन नेपाळ आणि तीन घानाचे आहेत. तेलंगणातील दोघांसह अकरा कामगारांना मध्यम ते गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

हेही वाचा :

महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, २० भाविकांचा मृत्यू
सगळी संपत्ती मुलीला देणार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00