Home » Blog » 57 crore : ५७ कोटी बनावट धनादेशप्रकरणी पहिली अटक

57 crore : ५७ कोटी बनावट धनादेशप्रकरणी पहिली अटक

जिल्हा परिषद केडीसीसी बँक शाखेतील धनादेश

by प्रतिनिधी
0 comments
57 crore

कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्हा परिषदेचे बनावट धनादेश आणि बनावट सही करुन ५७ कोटी हडप करण्याचा प्रकार फेब्रुवारी महिन्यात उघड झाला होता. जिल्हा परिषदेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास करुन या गुन्ह्यातील पहिल्या संशयिताला उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथून अटक केली आहे. कपिल चौधरी असे या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (57 crore)

जिल्हा परिषद केडीसी बँक शाखेच्या अकाउंटवरुन बनावट धनादेश आणि शिक्के वापरुन जिल्हा परिषदेच्या शासकीय खात्यावरुन ५७ कोटी चार लाख ४० हजार ७८६ रुपयांचे तीन धनादेशाचे व्यवहार झाले होते. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेकडे धाव घेतली. त्यानंतर ज्या बँकेत धनादेश वटणार होते ती सर्व खाती गोठवण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा परिषद वित्त विभागातील लेखा अधिकारी कृष्णात लक्ष्मण पाटील (वय ५२) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. (57 crore)

५७ कोटी रुपये हडप करण्याचा डाव उधळला असला तरी या गुन्हाचा मुख्य सुत्रधार शोधण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी शाहूपुरी पोलिसांना दिले. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी पोलिस उप निरीक्षक अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, उत्तम पाटील यांच्यासह दोन पोलिसांचे पथक तयार केले. या पथकाने ज्या बँकेत बनावट धनादेश वटवण्यासाठी खाती उघडली आहेत त्या खातेदारांची माहिती घेतली. त्यानंतर हे पथक दिल्ली आणि उत्तर प्रदेशात तपासासाठी गेले. पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील कपिल चौधरी (रा. गोविंदपुरम गल्ली, गाझियाबाद, उत्तरपदेश) याला ताब्यात घेऊन अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी देशमुख यांनी त्याला २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (57 crore)

या गुन्ह्यात आणखी संशयित असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. प्रत्येकी १८ कोटी रक्कमेचे तीन बनावट धनादेश तीन बँकांत वठवण्याचा प्रयत्न झाला. त्यापैकी एका बँकेतील खातेदाराला पोलिसांनी अटक केली आहे. आणखी दोन बँकेच्या खातेदारांचा पोलिस शोध घेत आहेत. या गुन्हातील मास्टरमाईंड शोधण्याचा पोलिसांचा कस लागणार आहे. (57 crore)

हेही वाचा :

 नागपूरला दंगलींचा शंभर वर्षांचा इतिहास

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00