नवी दिल्ली; महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क: ताप, सर्दी खोकला आला की सर्वसाधारणपणे पॅरासिटामॉल (Paracetamol) या औषधाचे सेवन केले जाते. तथापि, पॅरासिटामॉलसह ५३ औषधांचा दर्जा योग्य मापदंडानुसार नसल्याचे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन(CDSCO)ने घेतलेल्या नमुन्यांमध्ये आढळले आहे. दर महिन्याला (CDSCO)कडून नमुना चाचणी अहवाल तयार केला जातो. त्यानुसार उत्पादक कंपन्यांवर कारवाई केली जाते. या ५३ औषधांमध्ये मधुमेहासारख्या अनेक आजारांवर घेतल्या जाणाऱ्या औषधांचाही समावेश आहे. या औषधांमध्ये डायक्लोफेनाक, अँटीफंगल औषध फ्लुकोनाझोलचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त आढळले आहे.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून भारतात उपलब्ध असलेल्या सर्व औषधांची गुणवत्ता चाचणी केली जाते. वर उल्लेख केलेली औषधे ऑगस्ट महिन्यात केलेल्या गुणवत्ता चाचणीत उचित मापदंडानुसार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या औषधांमध्ये पेक्टिनेस, बीटा-ग्लुकोनेज, एमायलेस, प्रोटीज, अल्फा गॅलॅक्टोसिडेस, ग्लुकोमायलेज, सेल्युलेज, ब्रोमेलेन, झायलेनेज, लिपेज, हेमिसेल्युलेज, लैक्टेज, माल्ट डायस्टेस यांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Paracetamol )
हेही वाचा :
- Rohidas Patil : माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन
- सासू,सासऱ्यानेच एसटी बसमध्ये केला जावयाचा खून
- पितृ पंधरवड्यात मोहराच्या भाजीचे काय महत्त्व?