Home » Blog » शिष्यवृत्तीचे ३२०० कोटी थकले; कोल्हापुरात निदर्शने

शिष्यवृत्तीचे ३२०० कोटी थकले; कोल्हापुरात निदर्शने

Kolhapur News : शिष्यवृत्तीचे ३२०० कोटी थकले; कोल्हापुरात निदर्शने

by प्रतिनिधी
0 comments
Swabhimani vidyarthi parishad

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात विद्यार्थ्यांची सुमारे ३२०० कोटी रूपये शिष्यवृत्ती थकली आहे. शिष्यवृत्तीची ही रक्कम राज्य सरकारने तातडीने वर्ग करावी, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी परिषेदेने केली आहे. याप्रश्नी आज, (दि.२) महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मूक निदर्शने करण्यात आली. (Kolhapur News)

राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. अनेकदा या संदर्भात आंदोलने तसेच संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र राज्य सरकारने दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने तिजोरी रिकामी केली आहे. पण लाडक्या बहिणीच्या भावाचे शिष्यवृत्तीचे पैसे अडकले आहेत. लालफितीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना पैसे मिळत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. थकीत शिष्यवृत्ती संदर्भात महिनाभर पाठपुरावा करूनसुद्धा निर्णय झाला नाही. यामुळे उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून जाब विचारणार असल्याचा इशारा स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ शेट्टी यांनी दिला. निदर्शनात अण्णा सुतार, शिवेंद्र माने, आदित्य खिचडे, वर्धमान गुंडे आदींनी सहभाग घेतला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00