मुंबई : प्रतिनिधी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (दि. २८ जानेवारी) होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. हे प्रकरण कार्यतालिकेवर २३ व्या क्रमांकावर सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे.(ZP Election hearing)
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या आहेत. महापालिका, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका झाल्या नसल्याने तिथे प्रशासक राज्य सुरू आहे. गेल्या दोन ते चार वर्षांपासून राज्यातील २९ महापालिका, २५७ पालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समितीवर प्रशासक आहेत. सुरवातीला कोरोना, प्रभाग रचना आणि नंतर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबल्या. २०२२ मध्ये तत्कालीन महायुती सरकारच्या अध्यादेशामुळे निवडणुका रखडल्या आहेत.(ZP Election hearing)
स्थानिक स्वराज्य संस्थावर प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या तरतुदींचे उल्लंघन होत असून निवडणूका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित याचिकावर त्वरीत सुनावणी घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्ते पवन शिंदे यांच्यावतीने ॲड. देवदत्त पालोदरकर आणि ॲड. शशीभूषण आडगावकर यांनी मागील सुनावणीवेळी केली होती. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि सिंग यांचे खंडपीठ कोणती भूमिका घेणार आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (ZP Election hearing)
दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या निर्णयानंतर कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अनेक पक्ष स्वबळाचे नारे देत आहेत.
या महापालिका निवडणुका प्रलंबित
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई- विरार, मीरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी
या जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा.
हेही वाचा :
पहिल्याच दिवशी बाजारात आपटबार !
भाजपशासित उत्तराखंडमध्ये धडाधड फायरिंग