Home » Blog » झी मराठीवर `सावळ्याची जणू सावली`

झी मराठीवर `सावळ्याची जणू सावली`

येत्या काळात जुन्या मालिकांना निरोप देऊन विविध मराठी वाहिन्यांवर नव्या मालिका सुरू होणार आहेत.

by प्रतिनिधी
0 comments

येत्या काळात जुन्या मालिकांना निरोप देऊन विविध मराठी वाहिन्यांवर नव्या मालिका सुरू होणार आहेत. झी मराठी’ वाहिनीवर शिवा’, ‘पारू’, ‘लाखात एक आमचा दादा’ अशा बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. अशातच आता टीआरपीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी झी मराठीकडून आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली असून या मालिकेचं नाव आहे सावळ्याची जणू सावली’. सावली बदलेल का सौंदर्याची परिभाषा…?” अशी कॅप्शन देऊन मालिकेचा प्रोमो झी मराठी’ वाहिनीवर शेअर करण्यात आला आहे.

सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा पहिला प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांसमोर आला. यामध्ये काव्यांजली’ फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकर प्रमुख भूमिकेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट समोर आली आहे. नायकाची भूमिका अभिनेता साईंकित कामत साकारत आहे. यापूर्वी त्याने ‘रात्रीस खेळ चाले’, ‘तुझं माझं ब्रेकअप’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. प्राप्ती रेडकरसाईंकित कामतसुलेखा तळवलकर यांच्याशिवाय या मालिकेत वीणा जगतापगौरी करणआशिष कुलकर्णी हे कलाकार देखील भूमिका साकारणार आहेत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00