सोल : दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांची शुक्रवारी (४ एप्रिल) गच्छंती करण्यात आली. त्यांच्यावरील महाभियोगाला मान्यता देण्यासाठी संवैधानिक न्यायालयाने एकमताने मतदान केल्यानंतर त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे.(Yoon)
मार्शल लॉ लागू करण्याचा त्यांचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर संसदेने त्यांच्यावर महाभियोग आणला. डिसेंबरमध्ये त्यांना पदावरून निलंबित करण्यात आले होते. (Yoon)
शुक्रवारी निकालाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सोलच्या विविध भागात निकाल थेट पाहण्यासाठी जमलेल्या युन यांच्या टीकाकारांनी प्रचंड जल्लोष केला. यून यांच्या समर्थकांच्या डोळे मात्र डबडबले होते. (Yoon)
युन यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी ३ जूनपर्यंत तत्काळ निवडणूक होणे आवश्यक आहे.
३ डिसेंबरच्या रात्री, जेव्हा युननी सैन्याला संसदेत घुसण्याचा आदेश दिला, तेव्हा दक्षिण कोरियाच्या नागरिकांना धक्का बसला. त्यांच्या या निर्णयामुळे हिंसक, हुकूमशाही समर्थक पुन्हा आक्रमक झाले. त्यामुळे मार्शल लॉ इतिहास संपलेला नाही, अशी लोकांची भावना आहे. आता नवा नेता कोण असेल याची उत्सुकता तेथील जनतेला लागली आहे.
हेही वाचा :
ड्रॅगनचा अमेरिकेवर पलटवार
मोदींनी उपस्थित केला अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा