Home » Blog » Yogi slams oppositions: गिधाडांना मृतदेह, डुकरांना घाण मिळाली

Yogi slams oppositions: गिधाडांना मृतदेह, डुकरांना घाण मिळाली

योगींकडून विरोधकांच्या टीकेचा समाचार

by प्रतिनिधी
0 comments
Yogi slams oppositions

लखनौ : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांनी महाकुंभावर केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. योगींनी भर सभागृहात विरोधकांचा उल्लेख गिधाडे, डुक्कर असा केला. (Yogi slams oppositions)

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधकांवर टीका करताना म्हणाले, “गिधाडांना मृतदेह मिळाले. डुकरांना घाण मिळाली. तर संवेदनशील लोकांना नातेसंबंधाचे सुंदर चित्र मिळाले. व्यापाऱ्यांना व्यवसाय मिळाला. भाविकांना स्वच्छ व्यवस्था मिळाली.” (Yogi slams oppositions)

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीत, ट्रॅफिक जाम, प्रयागराज नदीपात्रातील अस्वच्छ पाणी आणि भाविकांना सोसावा लागणारा त्रास यावर विरोधकांनी भाजप आणि योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले होते. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराजमधील महाकुंभ नसून मृत्यूकुंभ आहे अशा तिखट शब्दात टीका केली होती. काँग्रेसनेही महाकुंभमधील नियोजनावर टीका केली आहे.(Yogi slams oppositions)

विरोधकांच्या या टीकेचा समाचार घेताना योगी म्हणाले, “हज दरम्यान गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या शेकडो मृत्यूंवर मौन बाळगणारे हे तथाकथित धर्मनिरपेक्ष विद्वानच महाकुंभाच्या भव्यतेवर टीका करतात. कार्यक्रमाला बदनाम करण्याचे आणि तोडफोड करण्याचे वारंवार प्रयत्न करुनही लाखो भाविकांनी पवित्र स्नान केले. विरोधकांच्या नकारात्मकतेला झुगारुन दिले. थोडक्यात विरोधकां जखमांवर मीठ चोळले.” (Yogi slams oppositions)

महाकुंभातील दुर्दैवी घटनेनंतरही यात्रेकरुंचा विश्वास आणि उत्साह कायम राहिला आहे. विविध अडचणींना तोंड देत ते प्रयागराजला पोहोचले. पवित्र  स्नान केले. आणि आनंदाने परतले, असेही मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ म्हणाले.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी थेट अखिलेश यांच्यावर हल्ला चढविला. ते म्हणाले, “आम्ही समाजवादी पक्षाप्रमाणे लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळलो नाही. त्यांच्याकाळात झालेल्या महाकुंभमेळ्यात त्यांना कुंभ पाहण्यासाठी आणि त्याची व्यवस्था पाहण्यासाठी वेळ नव्हता. म्हणूनच त्यांनी एका गैर सनातनीला कुंभमेळ्याचे प्रभारी बनवले होते.”

हेही वाचा :

महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00