नवी दिल्ली : एलन मस्कच्या मालकीच्या ‘एक्स’ने गुरुवारी केंद्र सरकारविरुद्ध खटला दाखल केला. कर्नाटक उच्च न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइटवरील सामग्री ब्लॉक करण्यासाठी आयटी कायद्याचा मनमानी वापर केल्याचा त्यात आरोप करण्यात आला आहे. तसेच याचिकेत ‘एक्स’ने सोशल मीडियावरील सामग्री नियमन बेकायदा होते, असे म्हणत मनमानी सेन्सॉरशिपला आव्हान दिले आहे. (X sues Centre)
केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या अर्थ लावण्यावर, विशेषतः कलम ७९(३)(ब) च्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे उल्लंघन करतो आणि ऑनलाइन अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कमकुवत करतो, असा युक्तिवाद ‘एक्स’ने केल्याचे वृत्तसंस्था पीटीआयने म्हटले आहे. (X sues Centre)
सरकार कलम ६९अ मध्ये नमूद केलेल्या संरचित कायदेशीर प्रक्रियेला बाजूला ठेवते आणि समांतर सामग्री-ब्लॉकिंग यंत्रणा तयार करण्यासाठी या कलमाचा वापर करत आहे, असा आरोप या खटल्यात करण्यात आला आहे.
आयटी कायद्याच्या कलम ६९अ नुसार सरकार राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा सार्वभौमत्वाच्या कारणास्तव कंटेंट काढून टाकण्याचा आदेश देऊ शकते, ज्यामुळे कंपन्यांना कारवाई करण्यासाठी स्पष्ट कायदेशीर आधार मिळतो. याउलट, कंपन्यांचा असा युक्तिवाद आहे की कलम ७९(३)(ब) अस्पष्ट आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मना कोणता कंटेंट बेकायदेशीर आहे हे ठरवावे लागते. या प्रकारामुळे त्यांना खटले किंवा वाईट प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. (X sues Centre)
कंपन्या अनेकदा कलम ६९अ चा वापर बचाव म्हणून करतात. काय बेकायदेशीर आहे याचा अंदाज लावण्याऐवजी सरकारने स्पष्टपणे कंटेंट काढून टाकण्याचे आदेश दिले तरच त्यांना जबाबदार धरले पाहिजे, असा युक्तिवाद कंपन्या करतात. यामुळे त्याची जबाबदारी अखेर सरकारकडे जाते. कायदेशीर जोखीम आणि पक्षपाताच्या आरोपांपासून प्लॅटफॉर्मचे संरक्षण होते आणि अधिकृत निर्देशांचे पालन सुनिश्चित होते.
‘एक्स’ ने दावा केला की सरकारचा सध्याचा दृष्टिकोन श्रेया सिंघल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये दिलेल्या निर्णयाविरुद्ध आहे. या निर्णयाने कंटेंट केवळ योग्य न्यायालयीन प्रक्रियेद्वारे किंवा कलम ६९अ अंतर्गत कायदेशीररित्या परिभाषित मार्गानेच ब्लॉक केला जाऊ शकतो, असे स्थापित करण्यात आले होते.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस हे सुटाबुटातले `योगी`
सुधा मूर्ती, अजिम प्रेमजी यांची नावे वापरून फसवणूक