अम्मान : आशियाई वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या दीपक पुनिया आणि उदित यांनी अखेरच्या दिवशी फ्रीस्टाइल प्रकारात रौप्यपदक जिंकले. भारताने या स्पर्धेतील सर्व प्रकारांत मिळून एक सुवर्ण, तीन रौप्य व सहा ब्राँझ अशा एकूण दहा पदकांची कमाई केली. (Wrestling)
पुरुषांच्या ९२ किलो फ्रीस्टाइल प्रकारात दीपकला अंतिम सामन्यात इराणच्या आमीरहुसैन बिगलारकडून ०-१० असा पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी, दीपकने उपांत्यपूर्व फेरीत किर्गिझस्तानच्या बेझकात राखिमोव्हला १२-७ असे, तर उपांत्य फेरीत जपानच्या ताकाशी इशिगुरोला ८-१ असे पराभूत केले होते. ६१ किलो गटातही उदितला अंतिम फेरीतील पराभवामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.(Wrestling)
यावर्षी, जपानच्या ताकारा सुदाने चुरशीच्या अंतिम सामन्यात उदितला ६-४ असे नमवले. उदितने उपांत्यपूर्व फेरीमध्ये किर्गिझस्तानच्या बेक्बोलोत मिर्झानाझारवर ९-६ अशी, तर उपांत्य फेरीत चीनच्या वानहाओ झोऊवर २-० अशी मात केली होती. अंतिम फेरीतही त्याने अखेरपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, त्याची झुंज अपयशी ठरली. उदितचे हे या स्पर्धेतील सलग दुसरे रौप्यपदक असून मागील वर्षी उदितने ५७ किलो गटात रौप्यपदक जिंकले होते. (Wrestling)
दरम्यान, १२५ किलो फ्रीस्टाइल गटात भारताचा दिनेश गोलिया ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर दिनेशने ब्राँझपदकाच्या लढतीत तुर्कमेनिस्तानच्या झ्यामुलामेत सापारोव्हचा १४-१२ असा पराभव केला. ८६ किलो गटात मात्र भारताच्या मुकुल दाहियाला ब्राँझपदकाच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. जपानच्या तात्सुया शिराईने मुकुलला ४-२ असे हरवून ब्राँझपदक पटकावले. (Wrestling)
या स्पर्धेमध्ये भारताने ग्रीको-रोमन प्रकारात दोन ब्राँझपदके जिंकली. त्यानंतर, भारतीय महिलांनी एक सुवर्ण, एक रौप्य व तीन ब्राँझ अशी कामगिरी केली. पुरुष फ्रीस्टाइल प्रकारात भारताने दोन रौप्य व एक ब्राँझपदक मिळवले. (Wrestling)
हेही वाचा :
जोकोविचला हरवून मेन्सिक विजेता