मुंबई : विमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या २०२५ च्या मोसमास १४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या वर्षी स्पर्धेचे सामने चार शहरांमध्ये खेळवले जाणार असून सलामीचा सामना बडोदा, तर अंतिम सामना मुंबईमध्ये रंगणार आहे. (WPL)
बडोद्यामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या बीसीए स्टेडियममध्ये गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात जायंट्स या संघांत सलामीचा सामना होईल. पहिले सहा सामने बडोद्यात झाल्यानंतर, स्पर्धेतील नंतरचे आठ सामने बेंगळुरूमध्ये होणार आहेत. त्यानंतर, चार सामने लखनौमध्ये खेळवण्यात येणार असून उर्वरित सामने मुंबईमध्ये होतील. मुंबईच्या बेबॉर्न स्टेडियमवर १३ मार्च रोजी एलिमिनेटर, तर १५ मार्च रोजी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. (WPL)
गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या पाच संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. यांपैकी केवळ दिल्ली कॅपिटल्स संघाचे सामने घरच्या मैदानावर होणार नाहीत. महिनाभर रंगणाऱ्या या स्पर्धेमध्ये एकूण २२ सामने खेळले जातील. साखळी फेरीत प्रत्येक संघाचे ८ सामने होणार आहेत. प्रत्येक संघ अन्य संघांविरुद्ध दोन साखळी सामने खेळेल. साखळी फेरीअखेर अग्रस्थानी राहिलेल्या संघास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार असून दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात येईल. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. (WPL)
स्पर्धेचे सर्व सामने सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहेत. या डब्ल्यूपीएल मोसमासाठी मागील महिन्यात खेळाडूंची लिलावप्रक्रियाही पार पडली होती. त्यामध्ये भारताचया सिमरन शेखला गुजरत जायंट्सकडून सर्वाधिक १.९ कोटी रुपयांचा करार मिळाला होता. (WPL)
Cities
Teams
Exciting Matches
Here’s the #TATAWPL 2025 Schedule
𝗠𝗮𝗿𝗸 𝗬𝗼𝘂𝗿 𝗖𝗮𝗹𝗲𝗻𝗱𝗮𝗿𝘀
pic.twitter.com/WUjGDft30y
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 16, 2025
हेही वाचा :
जोकोविच, झ्वेरेव, सबालेंकाची आगेकूच