Home » Blog » Workers Meet: भविष्यातील संकटे ओळखून लढा द्या

Workers Meet: भविष्यातील संकटे ओळखून लढा द्या

हर्षवर्धन सपकाळ यांचे कामगारांना आवाहन

by प्रतिनिधी
0 comments
Workers Meet

मुंबई : विशेष प्रतिनिधी : कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी ‘चक्का जाम’चा नारा दिला तर बंद होत होता. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहे. जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते, यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे शोषण फक्त शहरात होत नाही तर ते गावखेड्यापर्यंत पोहचले आहे. ही  शोषणावर आधारीत व्यवस्था संपवण्याची गरज आहे, त्यासाठी भविष्यातील संकटे ओळखून संघटीत लढा द्या, असे आवाहन महाराष्ट्र  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.(Workers Meet)

राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलन गुरुवारी मुंबईत झाले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, आधी उद्योगपती होते आता व्यापारी झाले आहेत. ते फक्त नफ्यासाठी काम करत आहेत. त्यांना कामगारांच्या कल्याणाशी काहीही देणेघणे नाही. मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांमुळे देशात श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरिब अधिक गरिब होत चालला आहे. देशाच्या पंतप्रधानांना गरिबांची चिंता नाही, “श्रीमंतांनी श्रीमंत होणे पाप आहे का?” असे पंतप्रधान म्हणतात ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. पंतप्रधानांना गरिबांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. गरिब, कष्टकरी, कामगार यांच्या विरोधातील हे सरकार आहे. (Workers Meet)
सपकाळ म्हणाले, ‘मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘दाल में कुछ काला’ नाही तर अख्खी डाळच काळी आहे, त्यांची नियत खोटी आहे आणि नीती तर नाहीच, अशा शक्तीविरोधात लढायचे आहे.’

हेही वाचा :
 भाजपने हिंदुत्व सोडले का?
तमिळनाडू सरकारचा वक्फ विधेयकाविरोधात ठराव

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00