Home » Blog » Woman arrest : मंत्री गोरेंवर आरोपी करणारी महिला अटकेत

Woman arrest : मंत्री गोरेंवर आरोपी करणारी महिला अटकेत

एक कोटीची खंडणी घेताना कारवाई

by प्रतिनिधी
0 comments
Woman arrest

सातारा : प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली. एक कोटीची खंडणी स्वीकारताना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पण या कारवाईवर शंका व्यक्त करताना विरोधकांनी एक कोटी रुपये आणले कुठुन? असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Woman arrest)

मंत्री गोरे हे माण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मंत्री गोरे हे भाजपचे असून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका महिलेला गोरे यांनी विवस्त्र् असलेले ५० फोटो टाकल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली होती. विरोधकांनी मंत्री गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गोरे यांनी हे प्रकरण जुने असून न्यायालयाने आपली निर्दोष मुक्त केल्याचे सांगून आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान या प्रकरणात तडजोड करण्यासाठी संबधित महिलेने तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. एक कोटी रुपये घेताना या महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली अशी माहिती पोलिसांनी दिली. (Woman arrest)

दरम्यान या कारवाईबद्दल विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना कारवाईबद्दल शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले, या महिलेने तीन कोटी रुपयांची मागणी केली आणि एक कोटी रुपये दिल्याचे आम्हाला कळतंय. हे जे काही नवे प्रकरण आहे. त्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पत्रकारांनाही त्यांचा आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकले आहे. या महिलेबाबत आज जी नवी बातमी येत आहे, त्याबाबत मला माहिती नाही. तीन कोटी हा आकडा खूप मोठा आहे. तसेच एक कोटी हा आकडाही मोठा आहे. आता ही बातमी खरी मानली तर एक कोटी रुपये कशाला दिले?, या महिलेकडे काय होते?, ज्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागले. एक कोटी रुपये कुठुन आले? असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. (Woman arrest)

हेही वाचा :

 मित्राचा खून करणाऱ्या तिघांना जन्मठेप

‘चिल्लर’ कोरटकर कसा सापडत नाही?

 केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याची हत्या

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00