नवी दिल्ली : अनेक प्राणीसंग्रहालयात आपल्याला काळा बिबट्या किंवा काळा चित्ता पाहायला मिळतो. तो नजरेस पडला की त्याचे भेदक डोळे आणि रेशमी काळी कातडी पाहून आश्चर्यचकीत व्हायला होते. जणू काय एक रेशमी काळा कोट घालूनच तो वावरत असतो…(Wild life)
पण त्याचा रंग आपल्याला मंत्रमुग्ध करतो, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. बिबट्याच कशाला, रंगाच्याबाबतीत आपण आपल्याच रंगाचा विचार केला तर लक्षात येईल की पृथ्वीवर राहणाऱ्या आठ अब्ज लोकांपैकी अनेकांची त्वचा गडद रंगाची असते. कारण आपल्यात आणि प्राण्यांमध्ये मेलॅनिन हे गडद तपकिरी रंगद्रव्य असते. तेच प्राण्याचा रंग ठरवते. (Wild life)
मेलेनिझम म्हणजे सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर आणि सरपटणारे प्राणी यांमध्ये दिसून येणारे मेलॅनिनचे जास्त प्रमाण. मानवांमध्ये ते दुर्मिळ असते.
याचे कारण काय? आपल्यापैकी सर्वांचाच जनुकांचा अभ्यास थोडाफार आहे. ते पालकांकडून मुलांकडे ते संक्रमित होतात. त्यांच्यात शारीरिक आणि जैविक गुणधर्म निर्दिष्ट करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती असते. त्यातील ‘उत्परिवर्तना’मुळे पुढच्या पिढीत त्वचा, फर, खवले आणि पंखांमधील मेलेनिझमचे प्रमाण वाढवू शकते.

काही प्राणी काळ्या रंगाचे का असतात? असे विचारले तर पटकन लक्षात येत नाही. पण उदाहरणे पाहिली तर ते पटकन लक्षात येईल.
मेलेनिझमचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून मांजर कुटुंबातील किंवा शास्त्रज्ञ ज्याला फेलिड्स म्हणतात त्या प्राण्यांमध्ये दिसून येईल. जगभरात मांजरींच्या लहान मोठ्या अशा जवळपास ४० प्रजाती आहेत. त्यात सैबेरियन वाघापासून अगदी घरातल्या मांजरीचाही समावेश करता येईल. (Wild life)
आपण काळा बिबट्या (ब्लॅक पँथर), काळा चित्तापासून सुरुवात केली. ब्लॅक पँथर हा प्रत्यक्षात बिबट्या आणि चित्ता या दोन्हीचा एक प्रकार आहे. त्याच्यातील जनुकीय उत्परिवर्तनामुळे त्याचे ठिपके झाकून जातात. पण रूडयार्ड किपलिंग यांच्यामते तरीही, ‘ते लख्ख उन्हात ते दिसू शकतात.’ त्यांच्या मतानुसार, काळा बिबट्या मध्य भारतातील आहे. खरे सांगायचे तर ते केवळ भारतीय बिबट्याचे उत्परिवर्तन मानले पाहिजे. कारण चित्ता आपल्या देशात अजिबात आढळत नाहीत.
वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ‘मेलेनिस्टिक’ बिबट्या दाट दमट जंगलातील अधिवासात विकसित झाले आहेत. त्याच्या रंगामुळे त्यांना सहज लता येते आणि शिकारही सहज करता येते. मोकळ्या प्रदेशात असलेल्या बिबट्याचा रंग काळा असण्याची शक्यता कमी असते कारण नैसर्गिक ठेवणीवरच हे सर्व अवलंबून असते. (Wild life)

चित्ता देवतेसमान…
आशिया आणि आफ्रिकेत आढळणारा बिबट्या मेलेनिझचा परिणाम असलेला एकमेव मार्जरप्राणी नाही. असे चित्तेही आढळतात. वाघ आणि सिंहानंतर मांजर कुटुंबातील तो तिसरा सर्वांत मोठा प्राणी आहे. तो अमेरिका, मेक्सिकोपासून अर्जेंटिनापर्यंत आढळतो. मेलेनिझम असलेला चित्ता अनेक जमातीत एक प्रमुख देवता मानली जाते. विशेषत: अझ्टेक, माया, इंका आणि इतर स्थानिक अमेरिकन लोकांत तो पूजनीय आहे.
मेलेनिझम इतर दोन मोठ्या मांजरींमध्येही दिसून आला आहे. ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प (STR) मधील बंगाली वाघांच्या कातडीतील काळ्या रंगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. येथील काळ्या वाघांचे तज्ज्ञ लाला ए. के. सिंग यांच्या मते, १९७५-७६ दरम्यान सिमिलीपालच्या जंगलात पहिल्यांदाच या वाघाची अधिकृतपणे नोंद करण्यात आली. डाउन टू अर्थच्या गोबर टाइम्समधील एका वृत्तानुसार, हिवाळ्याच्या एका सुंदर दिवशी वनाधिकारी आणि दोन परदेशी पर्यटकांनी मातुघर कुरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन पूर्ण वाढ झालेले काळे वाघ पाहिले.
आफ्रिकन चित्यांपैकी काही चित्त्यांमध्येही मेलेनिझमचे प्रमाण लक्षणीय दिसते. त्यांना ‘किंग जग्वॉर’ म्हणतात. पुन्हा, ही एक वेगळी प्रजाती नाही. खरं तर, चित्ता आणि वाघ हे केवळ अंशतः मेलेनिझम किंवा ‘स्यूडो मेलेनिझम’ असतात. फक्त बिबट्या आणि जग्वार पूर्णपणे ‘मेलेनिझम’ असतात. (Wild life)
काळे पतंग
इंग्लंडमध्ये पूर्णपणे काळ्या रंगाचे पतंगही आढळतात. औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर सुरू झाला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात काजळी मातलेली असे. या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या काळ्या पतंगांची प्रजाती विकसीत झाली. त्यामुळे भक्षकांपासून ते स्वत:चा बचाव सहज करू शकत होते. शास्त्रज्ञांनी या घटनेला ‘औद्योगिक मेलेनिझम’ असे म्हटले आहे.

कडकनाथ कोंबडी
सस्तन प्राणी आणि कीटकांनंतर आता काही पक्ष्यांची उदाहरणे पाहू. भारतातील मेलेनिझम पक्ष्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कडकनाथ कोंबडीची जात. मध्य प्रदेशातील झाबुआ येथे विकसीत झालेल्या या जातीबद्दल आता भरपूर माहिती उपलब्ध झाली आहे.
मेलेनिनमुळे त्याचे मांसही काळे असते. पण काळजी करू नका. सामान्य ब्रॉयलरपेक्षा हे मांस अधिक पौष्टिक मानले जाते. भारत सरकार आदिवासींना कडकनाथ कोंबडी पालनातून त्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मदत करीत आहे, ही चांगली बाब आहे. (Wild life)
चीनमधील सिल्की आणि इंडोनेशियातील अयाम सेमानी हे कडकनाथसारखेच आहेत. नेटवर त्यांचे फोटो उपलब्ध आहेत..

अल्बिनिझम आणि ल्युसिझम
प्राणीजगतातील मेलनिझम ही जीन्स-आधारित एकमेव घटना नाही. त्याच्या जोडीला अल्बिनिझम आणि ल्युसिझमही आहे. अल्बिनो मानव देखील आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, अल्बिनिझम म्हणजे मानवी शरीरातून मेलेनिझम नष्ट होणे. अल्बिनो प्राणी किंवा मानवाची त्वचा, फर, पंख सहसा पांढरी असते. त्यांचे डोळे सहसा लालसर-गुलाबी असतात कारण रंगद्रव्याच्या अभावामुळे रेटिनाच्या लाल रक्तवाहिन्या परावर्तित होतात. दुसरीकडे, ल्युसिझम म्हणजे प्राण्यांमधील रंगद्रव्याचे अंशतः नुकसान. असे प्राणी पांढरे दिसू शकतात. परंतु त्यांचे डोळे सामान्य रंगाचे असतात. तर अशीही निसर्गाची अद्भूतता आपल्यालया त्याच्या अंतरंगात शिरल्यानंतरच समजते.
(‘यंग एन्व्हार्यन्मेंटॅलिस्ट’च्या सौजन्याने)