Home » Blog » गुजरातला एअरबस प्रकल्प कुणी पळवला?, शरद पवार

गुजरातला एअरबस प्रकल्प कुणी पळवला?, शरद पवार

शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

by प्रतिनिधी
0 comments
sharad pawar

नागपूर : प्रतिनिधी : नागपुरात उद्योग यावे येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे; परंतु महाराष्ट्रात होणारा ‘फॉक्सकॉन-वेदांता’ प्रकल्प गुजरातला गेला. नागपूर येथे होणारा सी-२९५ लष्करी ट्रान्सपोर्ट एअरबस हा प्रकल्प गुजरातला कुणी पळवला ? प्रधानमंत्री एका राज्याची हिताची भूमिका घेत आहेत, त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला.

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेत पवार यांनी केंद्र व  राज्य सरकारवर टीका केली. व्यासपीठावर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार अभिजित वंजारी, यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारची जबाबदारी असूनही महिलांना संरक्षण देऊ शकत नाही. शेतकरीहित बघत  नाही.

युवकांना रोजगार देऊ शकत नाही. यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करून भाजपच्या हातून सत्ता काढणार असल्याचे शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार, जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार. २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे दिली जाणार. तसेच बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. या पंचसूत्रीच्या अंमलबजावणीची गॅरंटी देतो, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00