Home » Blog » Waqf land: वक्फ बोर्डाची मालमत्ता किती?

Waqf land: वक्फ बोर्डाची मालमत्ता किती?

व्यवस्थापन आणि कामाची पद्धत असते कशी …

by प्रतिनिधी
0 comments

नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी (२ एप्रिल) लोकसभेत सादर करण्यात आले आहे. त्यासंदर्भात चर्चाही सुरू झाली आहे. विधेयक येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासूनच या विधेयकावरून गदारोळ उठला आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे. मुस्लिमांच्या अधिकारांवर हे अतिक्रमण असल्याचा, तसेच विधेयक सादर करताना या समुदायाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्ड, त्याची मालमत्ता आणि त्याचे नियमन यांविषयी थोडक्यात माहिती…

वक्फ म्हणजे काय?

मुस्लिम कायद्याने मान्यता दिलेल्या धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी जंगम किंवा अचल मालमत्तेचे कायमस्वरुपी दिलेले दान म्हणजे वक्फ.

वक्फ मालमत्ता म्हणजे काय?

वक्फ मालमत्ता इस्लाम धर्माच्या अनुयायांनी दान केल्या आहेत. त्या समुदायाच्या सदस्यांद्वारे त्यांचे व्यवस्थापन केले जाते. प्रत्येक राज्यात एक वक्फ बोर्ड आहे. ती एक कायदेशीर संस्था आहे. ती मालमत्ता मिळवू शकतो, धारण करू शकते आणि हस्तांतरित करू शकते. वक्फ मालमत्ता कायमस्वरूपी विकल्या किंवा भाडेपट्ट्यावर दिल्या जाऊ शकत नाहीत. (Waqf land)

भारतात वक्फ बोर्ड किती जमीन नियंत्रित करते?

बोर्डाच्या देशभरात ८.७ लाख मालमत्ता आहेत. पैकी ९.४ लाख एकर जमिनीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बोर्ड करते. त्याची अंदाजे किंमत ₹१.२ लाख कोटी आहे. यामुळे वक्फ बोर्ड भारतीय रेल्वे आणि सशस्त्र दलानंतर भारतातील तिसरा सर्वांत मोठा जमीन मालक आहे. (Waqf land)

भाजप सरकार वक्फ कायद्यात सुधारणा का करत आहे?

१९९५ च्या वक्फ कायदा सुधारण्याच्या विधेयकानुसार, वक्फ बोर्डांना त्यांच्या मालमत्तांचे वास्तविक मूल्यांकन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करणे बंधनकारक असेल. सध्या, वक्फ बोर्डाचे बहुसंख्य सदस्य निवडून येतात, परंतु नवीन विधेयक कायदा झाल्यानंतर, सर्व सदस्यांना सरकार नामनिर्देशित करेल.

या तरतुदींमुळे सत्ताधाऱ्यांचे बोर्डावर पूर्ण नियंत्रण राहील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. नवीन विधेयकानुसार, मुस्लिमेतर व्यक्तीही सीईओ होऊ शकते. यात किमान दोन सदस्य मुस्लिमेतर असावेत अशी तरतूद करण्यात आली आहे. (Waqf land)

देशात किती वक्फ बोर्ड?

भारतात ३० वक्फ बोर्ड आहेत.

वक्फ मालमत्ता कोणत्या आहेत?

मुख्यतः, त्या म्हणजे शेतजमीन, इमारती, दर्गा/मझार आणि कब्रस्तान, ईदगाह, खानकाह, मदरसे, मशिदी, भूखंड, तलाव, शाळा, दुकाने आणि इतर विविध संस्था.

किती वक्फ मालमत्तांवर खटले सुरू आहेत?

सरकारच्या मते, वक्फ किंवा वक्फ मालमत्तेशी संबंधित वाद सोडवणाऱ्या अर्ध-न्यायिक संस्था असलेल्या वक्फ न्यायाधिकरणांकडे ४०,९५१ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी ९,९४२ प्रकरणे मुस्लिम समुदायाने वक्फचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांविरुद्ध दाखल केली आहेत.

वक्फ बोर्डाला कोणत्या प्रकारच्या खटल्यांचा सामना करावा लागतो?

गेल्या काही वर्षांत, वक्फ बोर्डाला मालमत्ता व्यवस्थापन, कायदेशीर वाद, महिला प्रतिनिधित्व आणि सुधारणांची आवश्यकता यासारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे.

वक्फ बोर्डाने स्थापन केलेल्या न्यायाधिकरणांनी दिलेल्या निकालांना उच्च न्यायालयात आव्हान देता येते का?

वक्फ बोर्ड न्यायाधिकरणाने दिलेल्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देता येते. उच्च न्यायालय न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवू शकते, निकालात सुधारणा करू शकते किंवा निकाल बदलूही शकते. (Waqf land)

वक्फ मालमत्ता कशा सूचीबद्ध आणि व्यवस्थापित केल्या जातात?
भारतातील वक्फचे नियमन वक्फ कायदा, १९९५ द्वारे केले जाते. एक सर्वेक्षण आयुक्त स्थानिक चौकशी करून, साक्षीदारांना बोलावून आणि सार्वजनिक कागदपत्रे मागवून वक्फ म्हणून घोषित केलेल्या सर्व मालमत्तांची यादी करतो. वक्फचे व्यवस्थापन मुतवल्ली करतात, म्हणजे तो एक प्रकारचे पर्यवेक्षक म्हणून काम करतो.

हेही वाचा :
‘कुंभ’मधील मृत्यू लपविण्यासाठी वक्फ विधेयक

इतिहास भाजपपेक्षा नितीश कुमारना जास्त दोषी ठरवेल

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00