Home » Blog » Walmik karad : वाल्मिकच्या ईडी चौकशीची मागणी फेटाळली

Walmik karad : वाल्मिकच्या ईडी चौकशीची मागणी फेटाळली

याचिकाकर्त्याला दंड; हायकोर्टाने फटकारले

by प्रतिनिधी
0 comments
walmik karad

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून राज्यभरात चर्चेत आलेल्या आरोपी वाल्मिक कराडला काहीसा दिलासा देणारी घटना घडली आहे. त्याच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) स्वतंत्र गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. इतकेच नव्हे तर त्याबाबत याचिका करणाऱ्या केतन तिरोडकर यांना २० हजाराचा दंडही ठोठावला आहे.(Walmik karad)

याचिकाकर्त्याचा हेतू स्पष्ट होत नसल्याचे सांगत मुख्य न्यायाधीश आलोक अराध्ये यांनी बुधवारी ती फेटाळून लावली.

मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक असलेल्या वाल्मिक कराडवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तो सीडीआयडीच्या विशेष तपास पथकाच्या ताब्यात आहे. त्याची कृष्णकृत्ये आणि कोट्यवधींच्या मालमत्तेची प्रकरणे चव्हाट्यावर येत असल्याने तो आणखी अडचणीत आला आहे. त्याने  अवैध मार्गाने शेकडो कोटींची मालमत्ता जमवली आहे. याप्रकरणी मंत्री महोदयांशी संबंधित अनेक कंपन्या आणि मालमत्ता समोर येत असल्याने याचिकेत निवडणूक आयोगालाही प्रतिवादी केले होते. (Walmik karad)

त्याच्यावर ईडीकडून मनी लाँड्रींग अंतर्गत गुन्हा दाखल करुन चौकशी करण्यात यावी, यासाठी केतन तिरोडकर यांनी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याबाबतचा झालेल्या सुनावणीवेळी मुख्य न्या. अराध्ये यांनी या मागणीमागील नेमका हेतू स्पष्ट होत नाही. केवळ प्रसिध्दी मिळविण्यासाठी असे स्वैर अर्ज करुन न्यायालयाचे वेळ दवडत असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यावर याचिकाकर्त्यांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली. मात्र अशा प्रकाराला पायबंद बसणे गरजेचे असल्याचे सांगत कोर्टाने त्यांना वीस हजार रुपये दंड ठोठावला. (Walmik karad)

कराडचा कोठडीतील मुक्काम वाढला

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल २४ दिवस वाल्मिक कराड फरार होता.  ३१ डिसेंबरला पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला होता. यानंतर कराडला २२ जानेवारीला बीड विशेष न्यायालयाकडून १४ दिवसांची कोठडी सुनावली. ती संपल्याने बुधवारी न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली.

हेही वाचा :

 मुलाच्या जखमेवर टाक्याऐवजी फेविक्विक

चाळीस तास बेड्या घातलेल्या अवस्थेत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00