मुंबई : प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात कराडचा उल्लेख आरोपी क्रमांक एक म्हणून केला आहे.(Valmik Karad)
विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात हा उल्लेख आहे.
दरम्यान, या प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. तसेच सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकल यांची नियुक्ती केल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (१ मार्च) ठाणे येथे बोलताना केला.
मस्साजोगचे सरपंच यांची खंडणी प्रकरणात आडवे आल्यामुळे हत्या करण्यात आली. याप्रकरणी दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुसार, २९ नोव्हेंबर रोजी आरोपी सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. त्यानंतर देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता. (Valmik Karad)
हत्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना पाच महत्त्त्वाचे साक्षीदार सापडले. ते पाचही साक्षीदार गोपनीय आहेत. याच साक्षीदारांच्या जबाबानंतर सीआयडीने वाल्मिक कराडविरोधात पुरावे गोळा केले आहेत. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख आरोपपत्रात केला आहे. (Valmik Karad)
पवन उर्जा प्रकल्पात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या ‘ आवादा’ कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारा वाल्मिक कराड यांचा आवाज आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांचे आवाजाचे एकमेकांशी जुळणारे नमुने, हत्या प्रकरणातील आरोपींचा खंडणीशी गुन्ह्याशी असणारा सहसंबंध दाखविणारे सीसीटीव्ही चित्रण या पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Valmik Karad)
सुमारे १८० साक्षीदार, पंच यांच्या मदतीने तपासानंतर केल्यानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपींचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याने त्यास पहिल्या क्रमांकाचा आरोपी करण्यात आले आहे. तपास अधिकारी बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासातील ‘ डिजिटल’ स्वरुपाचे पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून तपासून दोषारोप तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा :
आ. सतेज पाटील विधान परिषद गटनेतेपदी
शिंदेंच्या आणखी एका निर्णयाला फडणवीसांचा ब्रेक!