लॉस एंजल्स : हॉलिवूड चित्रपट अभिनेते वॅल किल्मर यांचे वयाच्या ६५ वर्षी निमोनियाने निधन झाले. ‘बॅटमन फॉरएव्हर’ आणि ‘द डोर्स’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘बॅटमन फॉरएव्हर’ या चित्रपटातील बॅटमनची भूमिका चांगलीच गाजली होती. २०१४ मध्ये त्यांना कॅन्सर झाला होता. त्यातून ते बरे झाले होते. (Val Kilmar)
न्यूयॉर्क टाईम्सने हॉलिवूड अभिनेता वॅल किल्मर यांचे ६५ वर्षी निधन झाल्याचे वृत्त दिले आहे. त्यांची मुलगी मर्सिडीज क्लिमरने त्यांच्या निधनाबद्दल दुजोरा दिला आहे. ते निमोनियाने आजारी होते. लॉस एंजिल्समध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. (Val Kilmar)
वॅल किल्मर यांचा जन्म कॅलिफोर्नियात झाला. जुईलियार्डमधून त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. १९९० दशकात ते हॉलिवूडमधील प्रमुख कलाकारापैकी एक होते. २०१४ मध्ये त्यांना घशाच्या कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यांनी कॅन्सरवर मात केली. पण त्यांचे निमोनियाने निधन झाले. (Val Kilmar)
‘बॅटमन फॉरएव्हर’ आणि ‘द डोर्स’ त्यांचे प्रसिध्द चित्रपट
‘बॅटमन फॉरएव्हर’ आणि ‘द डोर्स’ या चित्रपटाने वॅल किल्मरना सर्वात जास्त प्रसिद्ध मिळवून दिली. बॅटमॅनची क्रेझ त्यावेळी झाली होती. लांब केस असलेला अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिजे जात होते. १९८४ मध्ये टॉप सिक्रेट चित्रपटातून त्यांनी अभिनेत्याचा प्रवास सुरू केला. विनोदी चित्रपटातही त्यांनी छाप पाडली होती. हॉलिवूडमध्ये त्यांनी एक चांगले स्थान मिळवले होते. (Val Kilmar)
अक्शन चित्रपटातही भूमिका
वॅल किल्मर यांनी अक्शन चित्रपटातही भूमिका केल्या. ‘टॉप सिक्रेट’, ‘रियल जिनियस’ यासह अक्शन चित्रपट ‘टॉप गन’, ‘विलो’, ‘द घोस्ट एंड द डार्कनेस’, ‘द सेंट’, ‘द प्रिन्स ऑफ इजिप्त’, ‘अलेक्झांडर’ या चित्रपटात त्यांनी काम केले. ते कॉमेडी शो रियल जिनियस मध्येही पहायला मिळाले. १९८६ मध्ये गाजलेल्या टॉप गन मध्ये टॉम क्रुज बरोबर सह कलाकार म्हणून त्यांनी काम केले होते. (Val Kilmar)
शेवटचा चित्रपट टॉम क्रूझबरोबर
वॅल किल्मर १९९५ मध्ये गाजलेल्या बॅटमॅन फॉरइव्हर या चित्रपटात त्यांच्या नावाची चलती झाली. त्यांनी २०२२ मध्ये शेवटचा चित्रपट टॉप गन : मेवरिक’ हा होता. त्यांच्यासोबत टॉम क्रूझ अभिनेता होता. रॉकस्टारप्रमाणे लांब केसामुळे ते खुलुन दिसायचे. त्याचे टॉम स्टोन, टू रोमान्स हे चित्रपटही गाजले होते. (Val Kilmar)
हेही वाचा :
: मोहनलाल यांचा सिनेमा ठरला ब्लॉक बस्टर!