Home » Blog » Uttereshwar Cup : ‘खंडोबा’ उपांत्य फेरीत

Uttereshwar Cup : ‘खंडोबा’ उपांत्य फेरीत

उत्तरेश्वर तालीम पराभूत

by प्रतिनिधी
0 comments
Uttereshwar Cup

कोल्हापूर :प्रतिनिधी :  उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ संघाने यजमान उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ संघावर सडनडेथद्वारे १-० अशी मात करत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ  आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु आहे. (Uttereshwar Cup)

सोमवारी  खंडोबा तालीम मंडळ  आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा  झाला. बलाढ्य खंडोबाला उत्तरेश्वर  संघाने कडवी झुंज दिली. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून शॉर्ट पासिंगवर भर देत  करत चढाय केल्या.  मात्र दोन्हीही संघांना समन्वयाअभावी गोल नोंदवण्यात अपयश आले.  मध्यत्तरास सामना शून्य गोलबरोबरीत होता. (Uttereshwar Cup)

उत्तरार्धात आघाडी मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले.  दोन्ही संघानी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलक्षेत्रात खोलवर चढाया केल्या पण गोल नोंदवण्यात अपयश आले. पूर्णवेळत सामना गोल शून्य बरोबरीत राहिल्याने पंचांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय घेतला. टायब्रेकरमध्ये गोल नोंदविण्यात ‘खंडोबा’च्या नवीन रेघू त्याला अपयश आले. तर प्रथमेश गावडे, अमीन खजीर, प्रभू पोवार, अथर्व पाटील यांनी अचूक गोल नोंदवले. ‘उत्तरेश्वर’कडून विक्रम शिंदे याला गोल नोंदवता आला  नाही. तर  रोहित भोसले, सिद्धेश भाट, विवेक पाटील, संदेश शिंदे यांनी अचूकपणे गोल नोंदवत स्पर्धेतील आव्हान कायम राखले. टायब्रेकरनंतर ही सामना ४-४ असा बरोबरीत राहीला. त्यामुळे सामन्याचा निकाल सडनडेथवर लावण्याचा निर्णय पंचांनी घेतला. सडनडेतमध्ये ‘खंडोबा’च्या ऋतुराज संकपाळ याने मारलेला चेंडू गोल जाळीत विसावला तर ‘उत्तरेश्वर’च्या सोहम निकम याला गोल नोंदवण्यात अपयश आले. सामन्यात ‘खंडोबा’ने १-० असा विजय  मिळवत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सामनावीर म्हणून ‘खंडोबा’च्या अमीन खजीर याला तर लढवया खेळाडू म्हणून ‘उत्तरेश्वर’च्या यशराज नलावडे याला गौरविण्यात आले. (Uttereshwar Cup)

मंगळवारचा सामना

पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ मंडळ

वेळ : सायंकाळी ४.०० वा. (Uttereshwar Cup)

हेही वाचा :

शफालीची ‘ग्रेड बी’ कायम

तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00