कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज धक्कादायक विजयाची नोंद झाली. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाने बलाढ्य बालगोपाल तालीम मंडळाचा २-० असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू ही स्पर्धा पाटाकडील तालीम मंडळाने आयोजित केली आहे. (Uttareshwar win)
बलाढ्य बालगोपाल संघाविरुद्ध उत्तरेश्वर संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पूर्वार्धात बालगोपालने आघाडी मिळवण्यासाठी जोरदार चढाया केल्या. त्यांच्या ऋतुराज पाटील, सागर पोवार, रोहित कुरणे, प्रथमेश जाधव आणि टी मॉन यांनी खोलवर चढाया केल्या. पण उत्तरेश्वरने भक्कम बचाव केला. मध्यंत्तरास दोन्ही संघ गोल न करु शकल्याने गोलफलक कोरा होता. (Uttareshwar win)
उत्तरार्धात दोन्ही संघ आघाडी मिळवण्यासाठी मैदानात उतरले. ५१ व्या मिनिटाला उत्तरेश्वर संघाने यशस्वी चाल रचली. शुभम जाधवच्या पासवर रोहित भोसलेने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. बरोबरी साधण्यासाठी बालगोपालने जोरदार प्रयत्न केले. गोलरक्षक यशराज नलवडे याने उत्कृष्ट गोलरक्षण करत भक्कम बचाव केला. जादा वेळेत ८० व्या मिनिटानंतर शुभम जाधवने वेगवान फटक्याद्वारे गोल करत उत्तरेश्वर संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करत पुढील फेरीत प्रवेश केला. उत्तरेरश्वरकडून तुषार सूर्यवंशी, स्वराज्य पाटील, तुषार पुनाळकर, मयूर कदम, शुभम जाधव यांनी चांगला खेळ केला. गोलरक्षक यशराज नलवडे याची सामनावीर म्हणून निवड झाली. (Uttareshwar win)
बुधवारचा सामना : दिलबहार तालीम मंडळ वि. फुलेवाडी फुटबॉल तालीम मंडळ, दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :
भारताला विजयासाठी हव्या २६५ धावा