कोल्हापूर : प्रतिनिधी : बालगोपाल तालीम मंडळ संघावर २-० असा विजय मिळवत पाटाकडील तालीम मंडळ संघाने उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी (३० मार्च) दुपारी चार वाजता अंतिम सामना श्री शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात खेळवला जाणार आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे.(Uttareshwar Cup)
शनिवारी उपांत्य फेरीतील दुसरा सामना ‘पाटाकडील’ आणि ‘बालगोपाल’ यांच्यात खेळविण्यात आला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देण्यासाठी दोन्ही संघ सुरुवातीपासून आक्रमक खेळत होते पाटाकडील च्या ओंकार मोरे, नबी खान, ऋषिकेश मेथे-पाटील, अरबाज पेंढारी, यश देवणे, प्रथमेश येरेकर, अन्शीद आली या खेळाडूंनी ‘बालगोपाल’ची बचावफळी भेदण्यासाठी वेगवान चाली रचल्या. सामन्याच्या १९ व्या मिनिटाला त्यांना यामध्ये यश आले. (Uttareshwar Cup)
संघाच्या ओंकार मोरे याच्या पासवर अन्शीद अली याने पहिला गोल नोंदवून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच सामन्याच्या २१ व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे-पाटील याच्या पासवर प्रथमेश हेरेकर याने असा गोल केला . संघाला आघाडी मिळवून देण्यासाठी ‘बालगोपाल’कडून प्रथमेश जाधव, रोहित कुरणे, प्रतीक पवार, सिद्धार्थ पाटील, सागर पवार आदींकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र पूर्वार्धात २-० अशी आघाडी कायम ठेवण्यात पाटाकडील संघाला यश आले. (Uttareshwar Cup)
बालगोपलाच्या आशिष कुरणे, प्रतीक पवार, सिद्धार्थ पाटील आणि सागर पवार यांनी गोलफरक कमी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र, पाटाकडील संघाने पूर्वार्धात २-० अशी आघाडी कायम ठेवली.
सामन्याच्या उत्तरार्धातही पाटाकडील संघाचाच चढाया सुरूच होत्या. संदेश कासारने ‘डी’च्या बाहेरून जोरदार मारलेला फटका बालगोपाल च्या गोलरक्षक निखील खन्नाने अप्रतिम बचाव करत बाहेर काढला. (Uttareshwar Cup)
शेवटच्या काही मिनिटांत दोन्ही संघांकडून गोल करण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र कोणालाही संधी मिळाली नाही. अखेर, २-० अशा गोलफरकाने पाटाकडील तालीम मंडळ संघाने सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.
• सामनावीर : अरबाज पेंढारी (पाटाकडील तालीम मंडळ)
• लढवय्या खेळाडू : मनी कंदन (बालगोपाल तालीम मंडळ)
श्री शिवाजी संघावर कारवाई
शुक्रवारी (२८ मार्च) झालेल्या श्री शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम संघाच्या सामन्यात नियमभंगाची घटना घडली. श्री शिवाजी तरुण मंडळाच्या सहाय्यक संघ व्यवस्थापक विशाल भोगम यांनी मैदानावर मोबाईलचा वापर केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.स्पर्धेच्या नियमानुसार हा नियमभंग असल्यामुळे संघावर ३,००० रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा :