Home » Blog » Uttareshwar Cup: ‘शिवाजी’चा पुढील फेरीत प्रवेश

Uttareshwar Cup: ‘शिवाजी’चा पुढील फेरीत प्रवेश

सुभाषनगर फुटबॉल क्लबवर ३-१ ने विजय

by प्रतिनिधी
0 comments
Uttareshwar Cup

कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (२० मार्च) शिवाजी तरुण मंडळने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर ३–१ ने विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. या सामन्यात करण चव्हाण-बंदरे सामनावीर तर सुशील सावंत लढवय्या खेळाडू ठरला. (Uttareshwar Cup)
पुढील सामन्यात, शुक्रवारी (दि. २१) सकाळी ७:३० वाजता बालगोपाल तालीम मंडळ विरुध्द प्रॅक्टीस फुटबॉल क्लब आणि दुपारी ४ वाजता सम्राटनगर स्पोर्टस् विरुध्द उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ हा सामना होईल. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाने स्पर्धा आयोजित केली आहे.(Uttareshwar Cup)

छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात, पूर्वार्धाच्या ३५ मिनिटांत गोलफलक कोराच राहिला. ‘शिवाजी’कडून झालेल्या चढाईत गोलक्षेत्रात हॅण्डबॉल झाल्यामुळे मुख्य पंचानी पेनल्टी किक दिली. त्यावर बसंता सिंगने अचूक गोल नोंदवून ३७ व्या मिनिटाला संघाला आघाडीवर नेले. (Uttareshwar Cup)

उत्तरार्धात, ४४ व्या मिनिटास करण चव्हाण-बंदरेने सहज गोल करून संघाची आघाडी २-० अशी वाढवली. गोलची परतफेड करण्यासाठी ‘सुभाषनगर’च्या प्रकाश संकपाळ, आकाश मोरे, प्रविण सुतार, रवी शिंदे आणि रोहन चव्हाण यांनी खोलवर चढाया केल्या, परंतु समन्वय-अभावी व दिशाहीन फटाक्यांमुळे संधी वाया गेल्या. (Uttareshwar Cup)
एखाद्या चढाईत पुन्हा ‘शिवाजी’च्या गोलक्षेत्रात हॅण्डबॉल झाल्यामुळे मुख्यपंचानी पेनल्टी किक दिली. मात्र प्रतिक गायकवाडला गोल नोंदवण्यात अपयश आले. दुसऱ्या एका चढाईत मिळालेल्या संधीचा लाभ सुशील सावंतने उठवला. हेडव्दारा गोल नोंदवून त्याने ६२ व्या मिनिटाला एक गोलची आघाडी कमी केली. त्यानंतर लगेचच करण चव्हाण-बंदरेने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवून आघाडी ३-१ अशी वाढवली. ६४ व्या मिनिटाला आघाडी आणखी वाढवण्यासाठी ‘शिवाजी’कडून मध्ये करण चव्हाण-बंदरे, खुर्शीद अली, बसंता सिंग, दिग्विजय सुतार आणि इंद्रजीत चौगले यांनी केलेल्या  चढायांना यश मिळाले नाही.

हेही वाचा :
तीन सामन्यांसाठी रियान परागकडे नेतृत्व
भारतीय संघाला ५८ कोटींचे बक्षीस

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00