Home » Blog » Uttarakhand Firing : भाजपशासित उत्तराखंडमध्ये धडाधड फायरिंग

Uttarakhand Firing : भाजपशासित उत्तराखंडमध्ये धडाधड फायरिंग

आजी-माजी आमदारांत धुमश्चक्री; पिस्तूल, बंदुकीतून गोळ्यांचा पाऊस

by प्रतिनिधी
0 comments
Uttarakhand Firing

डेहराडून : भाजपशासित उत्तराखंडामध्ये दिवसाढवळ्या आजी-माजी आमदार आणि त्यांच्या समर्थकांत धुमश्चक्री उडाली. यावेळी बंदूक आणि पिस्तूलमधून धडाधड फायरिंग करण्यात आले. जवळपास १०० राऊंड फायर करण्यात आले. त्यामधील ७० पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मंगळवारी डेहराडून येथे ३८ व्या राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांतील वाद उफाळून आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (Uttarakhand Firing)

उत्तराखंडामध्ये भाजपचे माजी आमदार कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन आणि अपक्ष आमदार उमेश कुमार लोडेड केलेल्या गनसह भिडले. त्यामुळे धुमश्चक्री उडाली. एका व्हिडिओमध्ये माजी आमदार चॅम्पियन गोळीबार करताना दिसत आहेत.  त्यांनी आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयावर गोळीबार करत धडक मारली. त्यामुळे या घटनेने तणाव वाढला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चॅम्पियनला राणीपूर पोलिस ठाण्यात, तर उमेश कुमारना रुरकी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. २०२२ च्या निवडणुकीपासून दोन्ही गटात ताणतणाव सुरू आहे. (Uttarakhand Firing)

रविवारी दोन्ही गटाचे समर्थक भिडले. गोळीबार करणारे व्हिडिओही सोशल मीडियावर झळकले असल्याने येथे कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. एका व्हिडिओत माजी आमदार चॅम्पियन २४ ते २५ समर्थकांसह आमदार उमेश कुमार यांच्या ऑफिस आणि कार्यालयावर हल्लाबोल केला. त्यांनी टोळीयुद्धाप्रमाणे गोळी करताना दिसत आहेत. आमादारांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना यावेळी बेदम मारहाणही करण्यात आली. व्हिडिओ फुटेजमध्ये चॅम्पियन असॉल्ड रायफल लोड करताना आणि गोळीबार करताना दिसत आहे. एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात पिस्तूल घेऊन ते आमदार उमेश कुमारच्या कार्यालयात फिरतान दिसत आहेत.

या हल्ल्यात आमदार कुमार यांच्या कार्यालयातील राव इम्रान याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. पोलिस येण्यापूर्वीच चॅम्पियन आणि त्यांचे समर्थक घटनास्थळावरुन निघून गेले. आमदार उमेश कुमार यांचे पीए जुबेर काजमी यांनी माजी आमदार चॅम्पियन यांच्याविरोधात रुरकीच्या सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. चॅम्पियन यांनी बंदूकीतून १०० राऊंड फायर केल्याची तक्रार दिली आहे. त्यापैकी ७० पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी माजी आमदार चॅम्पियन आणि त्यांच्या चार समर्थकांना डेहराडून येथून आटक केली आहे. (Uttarakhand Firing)

हल्ला झाला तेव्हा आमदार उमेश कुमार कार्यालयात उपस्थित नव्हते. हल्ला झाल्यावर ते कार्यालयात आले. तेव्हा आमदार उमेश कुमारच्या समर्थकांनी माजी आमदार चॅम्पियनच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. आपल्या कार्यालयावर हल्ला झाल्याने चिडलेल्या आमदार उमेश कुमार यांनी हातात लोड केलेले पिस्तूल घेऊन चॅम्पियनच्या निवासस्थानकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत समर्थकही धावून गेले. पोलिसांनी हस्तक्षेप करुन आमदार उमेश कुमार यांना रोखले. हे सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत. (Uttarakhand Firing)

आजी माजी आमदारात गेले अनेक दिवस सोशल मिडियावर वॉर सुरू आहेत. दोघेही एकमेकांवर न्यायालयात खटले लढत असून दोन्ही समर्थकामध्ये खुन्नस आहे. काही दिवसापूर्वी चॅम्पियनने उमेश कुमार यांचा ‘अवैध मूल’ असा उल्लेख करणारी पोस्ट टाकली होती. काही वेळातच कुमार आणि त्यांचे समर्थक चॅम्पियनाच्या लांडौरा येथील घरात घुसले होते. चॅम्पयिनला शिविगाळ करत त्यांना समोर येण्याचे आव्हानही देत होते. आमदार उमेश कुमारने आव्हान दिल्याने त्याला प्रतिक्रिया देण्यास भाग पडले, असे माजी आमदार चॅम्पियनने प्रसारमाध्यमांना सांगितले.

हेही वाचा :
सैफवर हल्ला प्रकरणाला नवे वळण

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00