मायामी : अमेरिकेत एकीकडे पूर्व भागात आगीचे तांडव सुरू असतानाच दक्षिण भागात हिमवादळाने थैमान घातले आहे. दक्षिडेकडील राज्यांमध्ये तब्बल १,४०० मैलांच्या भूभागावर हे हिमवादळ सुरू असून आतापर्यंत त्यामुळे ३००० हून अधिक विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (US Snow storm)
हिमवादळामुळे शुक्रवारपासून या राज्यांमधील जनजीवन ठप्प आहे. शाळा, तसेच सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली असून काही राज्यांमध्ये आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. टेनेसी, ओकाहामा, टेक्सास, जॉर्जिया, फ्लोरिडा आदी राज्यांना प्रामुख्याने हिमवादळाचा फटका बसला आहे. जॉर्जिया व टेक्सासमध्ये १ लाख ३५ हजार घरे व कार्यालयांची वीज खंडित झाली आहे. डल्लास येथे ८ इंचांपर्यंत बर्फाचे थर साचले असून अग्नेय ओकाहामामध्ये ६ ते १० इंच जाडीचे बर्फाचे थर आहेत. (US Snow storm)
या हिमवादळामुळे दृश्यमानता कमी झाली असून लोकांना घराबाहेर पडण्याबाबत, तसेच वाहने चालवण्याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ओकाहामामध्ये चार दिवसांत ५०० हून अधिक वाहन अपघाताच्या नोंदी झाल्या असून यांपैकी ८५ अपघातांमध्ये लोकांना इजा झाल्याचे वृत्त आहे. हे हिमवादळ ओसरण्यासाठी किती दिवस लागतील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. (US Snow storm)
हेही वाचा :