महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रे वापरून २२ बोगस अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह इतर राज्यांतील बबँक अकाउंट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. (Ladki Bahin Yojna)
बार्शी प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आला. या अर्जांची तपासणी केली असता ज्या लॉगिन आयडीवरून हे अर्ज भरले ते लॉग इन आयडी सोलापूर जिल्ह्यातील नाहीत. ते परजिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. बार्शीच्या महिला बाल विकास अधिकारी रेश्मा पठाण यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ladki Bahin Yojna)
दरम्यान, सातारा जिल्ह्यात आपल्या पत्नीच्या नावे तब्बल २६ फॉर्म भरल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी संबंधित दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- ही राजकीय नव्हे; तर विचारधारेची लढाई : राहुल गांधी
- नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात पूजा
- पी.एम. किसान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा