Home » Blog » Ukrain’s attack: युक्रेनचा रशियाच्या बॉम्बर बेसवर हल्ला

Ukrain’s attack: युक्रेनचा रशियाच्या बॉम्बर बेसवर हल्ला

ड्रोन हल्ल्यानंतर प्रचंड स्फोट

by प्रतिनिधी
0 comments
Ukrain’s attack

एंगेल्स : युक्रेनने गुरुवारी (२० मार्च) रशियाच्या एंगेल्स स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याच्या ठिकाणी प्रचंड स्फोट झाले आणि पाठोपाठ मोठी आगही लागली. युद्ध आघाडी रेषेपासून युक्रेनने सातशे किमी असलेल्या या बेसला हल्ल्याचे लक्ष्य केले.(Ukrain’s attack)

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एका व्हिडिओमध्ये नुकसान झालेल्या इमारतींवरून धुराचे लोट येत असल्याचे दिसून आले. सोव्हिएत काळापासून हा एंगेल्स बेस कार्यरत आहे. रशियाचे टुपोलेव्ह टीयू-१६० अणु-सक्षम स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स आहेत. त्यांना व्हाईट स्वान्स म्हणूनही ओळखले जाते.

साराटोव्हचे गव्हर्नर रोमन बुसारगिन यांनी एंगेल्स शहरात युक्रेनियन ड्रोन हल्ला झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला. हल्ल्यामुळे एका एअरफील्डला आग लागली. या बेसशेजारच्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे, परंतु एंगेल्स बेसचा त्यांनी विशेष उल्लेख केला नाही. तथापि, ते या भागातील मुख्य एअरफील्ड आहे. (Ukrain’s attack)

एंगेल्स जिल्हा प्रमुख मॅक्सिम लिओनोव्ह यांनी सांगितले की, स्थानिक आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.

युक्रेनने यापूर्वी एंगेल्स हवाई तळावर हल्ला केला आहे. या घटना डिसेंबर २०२२ मध्ये घडल्या होत्या. जानेवारीमध्ये युक्रेनने या तळावर सेवा देणाऱ्या तेल डेपोवर हल्ला केल्याचा दावा केला होता. या हल्ल्यानंतर लागलेली आग पाच दिवस धुमसत होती.

रशियन लष्करी तळ लक्ष करण्यात येत असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. युक्रेनियन सैन्य नियमितपणे लांब पल्ल्याच्या ड्रोनचा वापर करून त्यांना लक्ष्य करते. युक्रेनची सुरक्षा सेवा (SBU) आणि युक्रेनचे मुख्य गुप्तचर संचालनालय (HUR) अनेकदा अशा हल्ल्यांची जबाबदारी घेतात. (Ukrain’s attack)

टीयू-९५ आणि टीयू-१६० अणु-सक्षम बॉम्बर्स असलेले एंगेल्स-२ हवाई तळ युक्रेनच्या सीमेपासून सुमारे ५०० किमी पूर्वेस आणि मॉस्कोच्या ७३० किमी आग्नेयेस आहे. मॉस्को टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून या तळावर अनेक वेळा हल्ला करण्यात आला आहे.

युक्रेनच्या सीमेपासून ४६५ मैलांपेक्षा जास्त अंतरावर असलेले एंगेल्स हे एक महत्त्वाचे धोरणात्मक बॉम्बर तळ आहे. येथून रशियन विमानांनी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे हल्ले केले आहेत. युक्रेनने या तळाला अनेक वेळा लक्ष्य केले आहे. अलिकडे जानेवारीत असाच हल्ला करण्यात आला होता. (Ukrain’s attack)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. यावेळी पुतिन यांनी युक्रेनमध्ये बिनशर्त युद्धबंदीचा अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला, परंतु ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांमध्ये ३० दिवसांचा विराम देण्यास सहमती दर्शविली.

हेही वाचा :

 मस्कच्या ‘एक्स’चा केंद्र सरकारविरोधात खटला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00