Home » Blog » Uddhav criticized BJP: जिनांनाही लाजवतील अशी सत्ताधाऱ्यांची भाषणे

Uddhav criticized BJP: जिनांनाही लाजवतील अशी सत्ताधाऱ्यांची भाषणे

उद्धव ठाकरेंकडून भाजपवर हल्लाबोल

by प्रतिनिधी
0 comments
Uddhav criticized BJP

मुंबई : विशेष प्रतिनिधी : वक्फ संशोधन सुधारणा विधेयकावेळी लोकसभेत सत्ताधारी नेते मुस्लिमांचा कळवळा आणत बोलत होते. जिनांनाही लाजवतील, अशी ही भाषणे होती. त्यात अमित शहांसह मित्रपक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. मग हे विधेयक नेमके मुस्लिमांविरोधात आहे की बाजूने? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हिंदुत्व सोडणारे कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गुरुवारी (३ एप्रिल) उपस्थित केला. (Uddhav criticized BJP)

वक्फ  सुधारणा विधेयक बुधवारी लोकसभेत मध्यरात्री बहुमताने मंजूर झाले. त्या विधेयकाच्या विरोधात  शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मतदान केले. त्यामुळे त्यांनी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजपा व एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्याला उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. (Uddhav criticized BJP)

ते म्हणाले, ‘वक्फ बोर्डात अफरातफर सुरू असेल तर त्याला पायबंद बसला पाहिजे. त्यात पारदर्शकता आलीच पाहिजे. मात्र काल ज्याप्रकारे भाषणे झाली यावरुन सरकारचे लक्ष वक्फच्या जमिनीकडे आहे.  भाजप नेमके काय करतेय हे कुणालाच कळत नाही. किरेन रिजिजू यांनी एकेकाळी गोमांस खाण्याचे समर्थन केले होते. त्यांनीच हे विधेयक सादर केले.  मात्र भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ३७० कलम हटवण्याला आम्ही पाठिंबा दिला होता. हे कलम हटवल्यानंतर काश्मिरी पंडित त्यांच्या घरी परत जातील अशी आशा दाखवण्यात आली. मात्र प्रत्यक्षात किती पंडिताना त्यांच्या जमिनी परत दिल्या?  हे सरकारने आधी सांगावे, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. (Uddhav criticized BJP)

ते म्हणाले, ‘आम्ही हिंदुत्व सोडले असे काही बाटग्यांचे, गद्दारांचे म्हणणे आहे. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी कधीही सर्व मुस्लिम देशद्रोही असल्याचे म्हटले नाही. बाळासाहेबांनी १९९५ साली बीकेसीमध्ये मुस्लिमांना इज्तेमा करण्याची परवानगी दिली होती. आज तिच जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली, हे तुमचे हिंदुत्व आहे का?’

अमेरिकेने लादलेल्या टेरिफवर बोला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशावर लावलेल्या आयात शुल्कावर उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. भाजपा सरकारच्या धोरणावर टीका केली. अमेरिकेने भारतावर २६ टक्के आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटावर पंतप्रधानांनी देशाला अवगत करायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा :
मोदी सरकारने ताठ कण्याने अमेरिकेला विरोध करावा

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00