अहमदाबाद : प्रतिनिधी : अमेरिकेत एका व्यक्तीने बंदुकीने केलेल्या गोळीबारात गुजराती वडील आणि मुलीची हत्या झाली. प्रदीप पटेल (वय ५६) आणि त्यांची मुलगी उर्मी (२४) यांच्यावर गोळीबार झाला. प्रदीप पटेल यांचा जागीच मृत्यू झाला तर उर्मी यांचा दोन दिवसाच्या उपचारानंतर मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. (Two Gujarati Killed)
टाईम्स ऑफ इंडियाने हत्येचे वृत्त दिले असून या वृत्तानुसार प्रदीप पटेल हे मुळचे गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातून कानोडा गावचे आहे. या घटनेचे वृत्त् कळताच त्यांच्या मूळ गाव कानोडा गावावर शोककळा पसरली आहे. कानोडा येथील कडवा पाटीदार समुदायाचे नेते चंदू पटेल हे प्रदीप पटेल यांचे काका आहेत. त्यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांच्या कुटुंबाला पहिल्यांदा मिडिया रिपोर्टस् कडून हल्ल्याची माहिती मिळाली. वीस मार्च रोजी पहाटे पाच वाजता प्रदीप पटेल त्यांचे दुकान उघडत असताना एका व्यक्तीने दुकानात प्रवेश केला आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. प्रदीप आणि उर्मी यांनी प्रतिकार केला पण त्यांना हल्लेखोरांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने दोघांवर गोळीबार केला. त्यामध्ये प्रदीप यांचा जागीच मृत्यू झाला तर उर्मी गंभीर जखमी झाल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फ्रेझियर डेव्हॉन व्हार्टन असे हल्लेखोराचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे, अशी माहिती चंदू पटेल यांनी दिली. (Two Gujarati Killed)
कानोडा गावात प्रदीप पाटील यांचे नातेवाईक राहतात. त्यांनी असे सांगितले की, पटेल कुटुंब हे २०१९ मध्ये अभ्यागत व्हिसावर अमेरिकेत गेले होत आणि तिथेच ते स्थायिक झाले आहेत. गुजराती पटेल समुदायाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सुविधा पुरवणाऱ्या दुकानांचे ते व्यवस्थापन करत होते. यापूर्वी ते दुसऱ्या दुकानाचे व्यवस्थापन करत होते. चार महिन्यापूर्वी त्यांनी सध्याच्या दुकानाचे व्यवस्थापन करण्यास घेतले आहेत. प्रदीप पटेल यांची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. दोन्ही मुलींचे विवाह गुजरातमधील कुटुंबात झाले आहेत. त्यांचा मुलगा कॅनडामध्ये काम करतो. उर्मी यांचा विवाह तीन वर्षापूर्वी झाला आहे, असे प्रदीप पटेल यांच्या भाऊ अशोक पटेल यांनी सांगितले. (Two Gujarati Killed)
हेही वाचा :
न्यायाधीश निवासस्थानातील ‘जळीत नोटा’ चौकशी अहवाल प्रसिद्ध