Home » Blog » Tunnel collapsed: निर्माणाधीन बोगद्यात सहा कामगार अडकले

Tunnel collapsed: निर्माणाधीन बोगद्यात सहा कामगार अडकले

तेलंगणात छत कोसळल्यामुळे दुर्घटना

by प्रतिनिधी
0 comments
Tunnel collapsed

श्रीशैलम : निर्माणाधीन बोगद्याचे छत कोसळून त्यात सहा ते आठ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.(Tunnel collapsed)

तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल (SLBC) च्या बांधकाम सुरू आहे. शनिवारी बोगद्याचा छताचा एक भाग कोसळला. त्यामुळे आत काम करणारे किमान सहा कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बोगद्याचे काम करणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सहा ते आठ कामगार अडकल्याची भीती आहे. (Tunnel collapsed)

‘काम सुरू असलेल्या या बोगद्याच्या आत सुमारे १२-१३ किमी अंतरावर छप्पर कोसळले. त्यावेळी किमान सहा ते आठ आत होते,’ असे अधिकाऱ्याने सांगितले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, बोगद्यावरील छत कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मदत आणि बचावकार्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, असे मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (Tunnel collapsed)

या दुर्घटनेत अनेक व्यक्तींना दुखापत झाल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अग्निशमन सेवा विभाग, हैदराबाद आपत्ती प्रतिसाद आणि मालमत्ता संरक्षण एजन्सी आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पाटबंधारे मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी, सल्लागार आदित्यनाथ दास आणि इतर पाटबंधारे अधिकारी एका विशेष हेलिकॉप्टरने अपघातस्थळी रवाना झाले आहेत. (Tunnel collapsed)

केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनीही अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, बोगद्यात अडकलेल्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचे आणि जखमींवर उपचार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनी या अपघाताची जबाबदारी मुख्यमंत्री रेड्डी यांनी घेतली पाहिजे, अशी टीका केली.

हेही वाचा :

प्रयागराजपुढे आरोग्यसंकट!

भारताच्या लोकशाहीवरील क्रूर हल्ला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00