Home » Blog » Tiger rescue: वाघ पोहोचला स्वयंपाकघरात

Tiger rescue: वाघ पोहोचला स्वयंपाकघरात

भीतीने उडाली घरच्यांची गाळण

by प्रतिनिधी
0 comments
tiger rescue

अलवर (राजस्थान) : सरीस्का व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेल्या वाघाने ग्रामीण भागात तब्बल तीन दिवस धुमाकूळ घातला. एका स्वयंपाकघरातही ठाण मांडले. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रैणी क्षेत्रातील चिल्की बासजवळील रैनी या गावात ही घटना घडली. ते लक्षात येताच घरच्या लोकांची गाळण उडाली. (Tiger rescue)

शुक्रवारी सकाळी चिल्का बास येथील  रैनी येथील एका फार्म हाउसच्या स्वयंपाकघरात वाघ अल्याची माहिती वन खात्याला मिळाली अशी माहिती सरिस्काचे डीएफओ अभिमन्यू सहारण यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याचे पथक घटनास्थळी पोचले. वाघ ज्या घरातील स्वयंपाकघरात गेला होता त्या घरातील लोक दुसऱ्या खोलीत घाबरुन लपले होते. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ट्रेंकुलाईज गनद्वारे डोस लावून वाघाला बेशुद्ध केले आणि जेरबंद केले. त्यानंतर वनखाते आणि नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. बेशुध्द् केलेल्या वाघाला सरिस्का वनक्षेत्रातच सोडण्याची शक्यता आहे.(Tiger rescue)

नागरिकांवर हल्ले

अलवर जिल्ह्यातील सरिस्कातील अकबर रेंजमधून आठवड्यापूर्वी वाघ (एसटी-२४०२) बाहेर पडला होता. वनखात्याला त्याचे लोकेशन मिळत नव्हते. बुधवारी दौसा जिल्ह्यातील महखुर्द गावात वाघ पोहोचल्याची माहिती मिळाली. तेथे तिघांवर हल्ला केला होता. गुरुवाली वाघ करणपुरात तर शुक्रवारी त्याने चिल्लीपर्यंत मजल मारली होती.(Tiger rescue)

वनखात्याच्या वाहनांवर केला होता हल्ला

बुधवारी वाघाला पकडण्यासाठी सरिस्कातील बांदीकुई रेंज फॉरेस्टचे पथक २४ तास कार्यरत होते. बुधवारी वाघाने वनखात्याच्या वाहनांवर हल्ला केला. वाहनाची काच फोडली आणि वनखात्याच्या पथकाला चकवा देऊन वाघ मोहरीच्या शेतात लपला होता. गुरुवारी तो महखुर्द गावापासून करणपूर गावात पोहचला. गावात मोठी दहशत माजवली. तिथेही पथक पोचले. शेवटी शुक्रवारी सकाळी चिल्लीमध्ये वाघाला रेस्क्यू करण्यात यश आले.

 

हेही वाचा:
तारुण्य टिकवण्यासाठी तिने मुलाचे…
हिमाचल गोठले!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00