Home » Blog » Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट

अश्विनच्या जागी संघात स्थान

by प्रतिनिधी
0 comments
Tanush Kotian

मुंबई : मुंबई संघातील अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियनची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित दोन कसोटींसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. रविचंद्रन अश्विनने निवृत्ती जाहीर केल्यामुळे संघात रिक्त झालेल्या स्थानावर तनुषला स्थान देण्यात आले. मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) सोमवारी तनुषच्या समावेशाची अधिकृत माहिती दिली. (Tanush Kotian)

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यास २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, तनुष भारतीय संघात सहभागी होईल. २६ वर्षीय तनुषला ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची तयारी करण्यासही सांगण्यात आल्याचे समजते. तनुषने मागील महिन्यात भारत अ संघातर्फे ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यामधील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या अनौपचारिक कसोटीमध्ये त्याने ४४ धावाही फटकावल्या होत्या. तनुष सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघातर्फे खेळत आहे. (Tanush Kotian)

भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्याचा आघाडीचा अष्टपैलू फिरकीपटू म्हणून तनुषचे नाव घेतले जाते. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या २०२३-२४ च्या मोसमामध्ये तनुषने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. या स्पर्धेत त्याने १६.९६ च्या सरासरीने २९ विकेट घेण्याबरोबरच पाच अर्धशतके व एका शतकासह ५०२ धावाही केल्या होत्या. मुंबईला ४२ वे रणजी विजेतेपद मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याने आतापर्यंत ३३ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ४१.२१ च्या सरासरीने २५२३ धावा केल्या असून त्याच्या नावावर १०१ विकेटही जमा आहेत. यावर्षीच त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्स संघातर्फे पदार्पण केले होते. (Tanush Kotian)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00