Home » Blog » Three found dead: अधिकारी भावंडांसह आईचा मृतदेह आढळला

Three found dead: अधिकारी भावंडांसह आईचा मृतदेह आढळला

कोची येथील धक्कादायक घटना

by प्रतिनिधी
0 comments

रांची/कोची : झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) परीक्षेतील टॉपर, अधिकारी भाऊ आणि त्यांच्या आई अशा तिघांचा मृतदेह कोची येथील सरकारी निवासस्थानात आढळला. शालिनी विजय, भाऊ मनीष आणि शकुंतला अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.(Three found dead)

शालिनी झारखंड लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेतील टॉपर आहेत. त्या झारखंड समाज कल्याण विभागातील सहाय्यक संचालक होत्या. २०२० पासून त्या रजेवर होत्या. भाऊ मनीष आयआरएस अधिकारी आहेत. सध्या कोची येथील केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून ते कार्यरत होते.

शालिनी यांची कारकीर्द प्रदीर्घ कायदेशीर पेचप्रसंगात अडकली. त्यांच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला होता. तिच्यासह आणखी काही उमेदवारांची सीबीआय चौकशी सुरू होती. सहा दिवसांनी त्या रांची न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहणार होत्या. (Three found dead)

पोलिसांनी तिघांचे मृतदेह पांढऱ्या कपड्यात झाकलेले आणि पाकळ्या टाकलेल्या अवस्थेत आढळून आले. कोचीच्या कक्कनड शेजारच्या ईचमुक्क येथे भावंडांनी कथितपणे मनीषच्या अधिकृत क्वार्टरमध्ये स्वतंत्र खोल्यांमध्ये आत्महत्या केली. त्यापूर्वी आईचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शकुंतला या मुलांनी गळफास घेण्यापूर्वी नैसर्गिक कारणाने मरण पावल्या असाव्यात, अशी शक्यता तपासअधिकाऱ्यांनी व्यक्त केली, तथापि, शवविच्छेदनानंतरच मृत्यूबाबत निश्चितपणे काही समजेल, असे असिस्टंट सीपी (थ्रीक्काकारा) पी. व्ही. बेबी यांनी सांगितले. (Three found dead)

मनीष यांचे सहकाऱ्यांनी त्यांच्याकडे आले असता तेव्हा त्यांचा मृतदेह सापडला. सुटीनंतर ते कामावर हजार होणार होते, मात्र त्यांचा संपर्क झाला नव्हता. त्यामुळे त्यांचे सहकारी घरी आले होते.

पोलिसांना मनीषच्या डायरीमध्ये १५ फेब्रुवारीला लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी सध्या दुबईत असलेल्या त्यांच्या लहान बहिणीला काही कागदपत्रे सोपवण्याची विनंती केली आहे. या चिठ्ठीत तिचा फोन नंबरही दिला आहे. त्या लवकरच भारतात येतील, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (Three found dead)

शालिनींच्या निवडीवर आक्षेप

जेपीएससीची २००३ ला परीक्षा झाली होती. त्यात निवडलेल्या ६४ जणांमध्ये शालिनी टॉपर होत्या.

यात अयशस्वी झालेल्या काही उमेदवारांनी भरती प्रक्रियेला आव्हान दिले. जे उत्तीर्ण झाले त्यांपैकी बरेच राजकारणी किंवा अधिकाऱ्यांशी संबंधित होते, असा आरोप करण्यात आला. राज्य सरकारकडून तपास संथगतीने सुरू होता. त्यावेळी कोर्टात झालेल्या सुनावणीत झारखंड हायकोर्टाने २०२२ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केले. (Three found dead)

सीबीआयने शालिनी आणि इतर भर्तींवर आयपीसीच्या कलम ४२० (फसवणूक), ४२३ (खोटी कागदपत्रे) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या १३(२) आणि १३(१)(डी) अशा गुन्ह्यांतर्गत आरोप दाखल केले. पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला होणार आहे.

विजय कुटुंब २०१३ पर्यंत रांचीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. शालिनीच्या आई बोकारो येथे महाविद्यालयात प्राध्यापक होत्या.

हेही वाचा :

ट्रम्पनी मतदान निधीबाबत केलेला दावा चिंताजनक

मोदी सरकारचे प्राधान्य पीआर स्टंटला, राष्ट्रीय सुरक्षेला नाही

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00