Home » Blog » राज्यातील सरकार योगी चालवणार नाहीत

राज्यातील सरकार योगी चालवणार नाहीत

अजित पवार यांचा 'बटेंगे तो कटेंगे'बाबत पुनरुचार

by प्रतिनिधी
0 comments
Ajit Pawar file photo

मुंबई : विशेष प्रतिनिधी : योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. ते महाराष्ट्राचे सरकार चालवणार नाही. त्यामुळे   ‘बटेंगे तो कटेगे,’  ही विचारसरणी आपल्याला मान्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.

विधानसभा निवडणूक प्रचारातील ‘बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है,’ या घोषणाबाबत भाजपा व महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले असताना आता उपमुख्यमंत्री पवार यांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे.

नवाब मलिक यांच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत हे लढवय्या नेते आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

आपल्या देशात सगळ्या जातीधर्माचे लोक राहतात, त्यामुळे एकत्र राहावे लागेल. महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकर यांच्या  विचारांवर चालणाऱ्यांनाच लोक जास्त पसंत करतात, असे सांगून नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबाबत म्हणाले की,

मी त्यांना १९९० पासून त्यांना ओळखतो. त्यांच्यावर केलेल्या आरोपातील प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग नाही हे मला माहिती आहे. मलिक यांना उमेदवारी देऊ नका, असे मला सांगण्यात आले होते. पण त्यांची चूक नसताना त्यांच्यावर अन्याय होणे योग्य नव्हते. त्यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला नसताना त्यांना बाजूला ठेवणे योग्य नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या गोष्टींवर बोलताना अजित पवार म्हणाले की, पत्नी सुनेत्रा यांना बारामतीतून उभे करणे ही  चूक होती. मला ते मान्य आहे. आता लोकसभेत सुप्रियाताईंना आणि विधानसभेत मला पाठिंबा देणार असल्याचा निर्धार बारामतीच्या जनतेने केला आहे. राष्ट्रवादीच्या विचारसरणीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आमचा पक्ष शरद पवार यांच्या विचारधारेवर चालतो. धर्मनिरपेक्षतेवर आमचा विश्वास असून यापुढेही त्यावरच वाटचाल सुरू राहणार आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00