17
अमरावती : माझ्या पराभवाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मला पाडण्याची राणांची लायकी नाही, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर केली.
माझा पराभव त्यांनी करावा, एवढी राणा दाम्पत्याची औकात नाही, असे म्हणत कोणताही मतदारसंघ निवडा. तुम्ही बिगर पार्टीचे आणि मी बिगर पार्टीचा, असे थेट आव्हान कडू यांनी राणा दाम्पत्याला दिले. तसेच, व्हीएमच्या जागी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आणि पहा. मर्द असाल तर पुन्हा निवडणूक घ्या, असे आव्हान त्यांनी दिले. त्यावर आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही, लोकांनी त्यांना हटवले आहे. बच्चू हटाव हा नारा लोकांनीच दिला, असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल केला.