मुंबई : होळीचा सण बॉलीवूड स्टार जॉन अब्राहमसाठी आनंदाचे रंग घेऊन आला. बॉक्स ऑफिसवर त्याच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी प्रचंड यश मिळवले. शुक्रवारी (१४ मार्च) त्याचा ‘द डिप्लोमॅट’ हा सत्य घटनेवर आधारित थ्रिलर चित्रपटाने चार कोटीवर कमाई केली. (The Diplomat)
शिवम नायर दिग्दर्शित हा चित्रपट उज्मा अहमद या भारतीय मुलीच्या कहाणीवर आधारित आहे. ही भूमिका सादिया खतीबने साकारली आहे. लग्नात झालेल्या फसवणुकीमुळे ती पाकिस्तानमध्ये अडकते. जॉन अब्राहम या चित्रपटात भारतीय राजदूत जे. पी. सिंगची भूमिका साकारत आहे. तो तिच्या बचावात महत्त्वाची भूमिका बजावतो.(The Diplomat)
पहिल्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल, याबाबत साशंकता होती, परंतु ‘द डिप्लोमॅट’ने ते खोटे ठरवले आणि बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, १४ मार्च रोजी, पहिल्याचे दिवशी या चित्रपटाने ४ कोटीने सुरुवात केली. कदाचित होळीच्या सुटीमुळे बॉक्स ऑफिसवर ही चांगली सुरुवात झाली असेल. येत्या आठवड्यात हा सिनेमा प्रेक्षक मोठ्या संख्येने पाहतील, अशी अपेक्षा आहे.(The Diplomat)
विशेष म्हणजे, विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचे तगडे आव्हान असतानाही ‘द डिप्लोमॅट’ने चांगली सुरुवात केली हे येथे उल्लेखनीय आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. आता एका महिन्यानंतर, रिलीजच्या पाचव्या शुक्रवारी (१४ मार्च) ७.२५ कोटी रुपये कमावले. या आकडेवारीचा विचार करता, ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट सिनेप्रेमींसाठी दुसरी पसंती म्हणून समोर आला आहे, असे म्हणता येईल.(The Diplomat)
या चित्रपटाचा ऑक्युपन्सी रेट पाहिला तर, १४ मार्च रोजी ‘द डिप्लोमॅट’साठी २०.४५% प्रेक्षक उपस्थित होते. सकाळच्या शोमध्ये ७.३१% प्रेक्षक उपस्थित होते. दुपारच्या शोला ही संख्या १९.४२% पर्यंत वाढली. ही टक्केवारी आणखी वाढून संध्याकाळच्या शोला ऑक्युपन्सी रेट २८.५०% गेला. रात्रीच्या शोला मात्र तो थोडा कमी म्हणजे २६.५६% होता. चेन्नईमध्ये सर्वाधिक ऑक्युपन्सी ७५.३३% रेट होता. भोपाळमध्ये २९.५०% आणि पाठोपाठ कोलकाता २९% रेट होता.
हेही वाचा :
सुनीता विल्यम्सना आणण्यासाठी ड्रॅगन झेपावले
भारतीय संशोधक विद्यार्थिनीचा व्हिसा रद्द