Home » Blog » Tamim Iqbal: तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका

Tamim Iqbal: तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका

by प्रतिनिधी
0 comments
Tamim Iqbal

ढाका : बांगला देशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल याला मैदानावरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाइनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग सामन्यादरम्यान ही घटना घडली.(Tamim Iqbal)

५० षटकांच्या सामन्याच्या पहिल्या डावात तमीम क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी ही घटना घडली. घटनेनंतर तत्काळ हेलिकॉप्टर मागवण्यात आले, परंतु त्याला मैदानावरून बाहेर काढता आले नाही. नंतर त्याला फजिलातुन्नेसा रुग्णालयात नेण्यात आले.

“त्यांना छातीत दुखत असल्याची तक्रार होती आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करण्यात आली. ईसीजी काढण्यात आला,” असे बीसीबीचे मुख्य चिकित्सक देबाशिष चौधरी यांनी स्पष्ट केले. ‘थोडीसा दोष आहे, मात्र कधीकधी आपल्याला (हृदयाची स्थिती काय आहे) ते लगेच समजत नाही, असे ते म्हणाले. (Tamim Iqbal)

‘पहिल्या रक्त तपासणीत, एक दोष स्पष्ट झाला. तमीमने अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले आणि त्याला ढाकाला परत जायचे आहे, असे त्याने सांगितले. तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रुग्णालयातून नेण्यात आले. पुन्हा मैदानावर परतताना पुन्हा छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याला दुसऱ्यांदा रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी मोठा हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. आता ते फजिलातुन्नेसा रुग्णालयात निरीक्षणाखाली आहे,’ असे चौधरी यांनी सांगितले.

या वर्षी जानेवारीमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून संघ बाहेर पडण्यापूर्वी, तमीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. २००७ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने २४३ एकदिवसीय, ७० कसोटी आणि ७८ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये १५,००० हून अधिक धावा केल्या आणि २५ शतके ठोकली आहेत. (Tamim Iqbal) २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वी त्याने निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु दुसऱ्याच दिवशी त्याने आपला निर्णय मागे घेतला. अखेर पाठीच्या दुखापतीमुळे तो आयसीसी स्पर्धेत खेळू शकला नाही. त्याने सप्टेंबर २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ढाका येथेच झालेल्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशकडून शेवटचा सामना खेळला होता.

हेही वाचा :
हैदराबादचा झंझावाती विजय

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00