नवी दिल्ली : प्रतिनिधी : सात आश्चर्यापैकी एक असलेल्या ताजमहाल ही सौदर्यपूर्ण ऐतेहासिक वास्तू पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भारतात येतात. पर्यटकांसाठी आकारलेल्या तिकीट विक्रीतून ताजमहालने २९७ कोटी रुपये कमावले आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. एएसआय संरक्षित स्मारकापैकी सर्वाधिक कमाई करणारे स्मारक म्हणून उदयास आले आहे. (Tajmahal income)
मुघल काळातील प्रतिष्ठित स्मारक आणि भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक ताजमहाल ही वास्तूआहे. गेल्या पाच वर्षांत तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण-संरक्षित स्मारक आहे. राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात, केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की, ताजमहालने गेल्या पाच वर्षांत तिकिटांमधून २९७ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे, जे एएसआय-संरक्षित सर्वात फायदेशीर स्मारक बनले आहे.(Tajmahal income)
२०२३-२४ या आर्थिक वर्षात, कुतुबमिनार आणि लाल किल्ला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते आणि त्यांनी अनुक्रमे २३.८ कोटी आणि १८.०८ कोटी उत्पन्न मिळवले.(Tajmahal income)
२०२० मध्ये आग्रा किल्ला आणि कुतुबमिनार दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते, तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये तामिळनाडूतील स्मारक समूह ममल्लापुरम आणि सूर्य मंदिर, कोणार्क यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर ठेवण्यात आले.(Tajmahal income)
ताजमहालची माहिती अशी
मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महल यांच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला आहे.
ताजमहाल दिल्लीतील कुतुबमिनारपेक्षा उंच मानला जातो. ताजमहालची उंची ७३ मीटर आहे, तर कुतुबमिनारची उंची ७२.५ मीटर आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात १९८३ मध्ये ताजमहाल वास्तूचा समाविष्ट झाला आहे.
अनेक ऐतिहासिक अहवालांनुसार, ताजमहाल बांधण्यासाठी जवळजवळ २२ वर्षे लागली. त्याचे बांधकाम १६३२ ते १६५३ पर्यंत चालले आणि संपूर्ण मुघल साम्राज्य, मध्य आशिया आणि इराणमधून २०,००० हून अधिक कारागिरांना बोलावण्यात आले.
ताजमहाल राजस्थानातील मकराणा येथून आणलेल्या पांढऱ्या संगमरवरापासून बनवले आहे. उस्ताद-अहमद लाहोरी हे ताजमहालचे मुख्य शिल्पकार होते. (Tajmahal income)
हेही वाचा :
आयुक्तांनी स्वत:च्या डोक्यात झाडली गोळी
गळ्यात पट्टा बांधून कर्मचाऱ्याला कुत्र्यासारखे फिरवले
‘हॅन्डस् ऑफ’ रॅलीत हजारो अमेरिकेन रस्त्यांवर