नवी दिल्ली : अमेरिकन न्यायालयाने २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राणाला भारताला परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडलीला राणाने मदत केली होती. (tahawwur rana)
राणा हा मूळ पाकिस्तानी कॅनेडियन बिझनेसमन आहे. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या २६/११च्या हल्ल्यातील राणाच्या भूमिकेचा तपास एनआयए करत आहेत. राणाला भारताकडे सोपवावे, अशी मागणी अमेरिकेकडे केली होती. पण त्याला अमेरिकेने अटक करुन त्यांच्याच ताब्यात ठेवले आहे. राणाला भारताकडे प्रत्यार्पण करावे, यासाठी भारताचे प्रयत्न सुरू केले होते.
राणाने आपल्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येऊ नये, म्हणून अमेरिकन कोर्टात याचिका दाखल केली होती. पण त्याची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. राणाला भारताकडे प्रत्यार्पित करता येऊ शकते असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप असून त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटही काढण्यात आले आहे. एनआयने कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. (tahawwur rana)
अमेरिकन न्यायालयीन सुनावणीत अमेरिकी सरकारच्या वकिलाने, राणा हा डेविड हेडलीचा लहाणपणापासूनचा मित्र आहे. हेडली लष्कर ए तैयब्बामध्ये सहभागी असल्याचे राणाला माहीत होते. हेडली हा पाकिस्तानी अमेरिकन आहे. राणाने हेडलीला मदत केली आणि त्याच्या कारवायांना संरक्षण दिले होते. दहशतवादी संघटना आणि त्यांच्या समर्थकांना राणा मदत करत होता. राणाने अनेकदा हेडलीबरोबर चर्चा केल्या होत्या. तसेच मुंबईवरील हल्ल्यासाठी हेडलीने बैठका घेतल्याची माहिती राणाला होती. हल्ल्याच्या काही ठिकाणांची माहिती होती. राणाचा हल्ल्याच्या कटात सहभाग होता आणि त्याने दहशतवादी कृत्य तडीस नेण्याचे काम केले होते, असा दावा केला. (tahawwur rana)
एनआयए ची चार्जशिट
मुंबई हल्ल्यासंबंधी एनआयएने दिल्लीतील एका न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये हेडली, राणा, हाफिज सईद, जकी उर रहमान लखवी, इलियास काश्मिरी, साजिद मीर, अब्दुल रहमान हाशिम सैय्यद, मेजर इकबाल आणि मेजर समील या सर्वांची नावे आहेत. एनआयच्या म्हणण्यानुसार, या आरोपींनी लष्कर ए तैय्यबा आणि हुजीच्या बाजूने काही महत्वपूर्ण स्थानाची रेकी करण्याची योजना बनवली होती आणि ती पूर्णत्वास नेली होती. ही ठिकाणे २६/११ हल्ल्यातील ठिकाणे आहेत.
२६/११ च्या हल्ल्यानंतर हेडली ७ मार्च २००९ ते १७ मार्च २००९ या कालावधीत भारतात आला होता. त्याने दिल्ली, पुष्कर, गोवा, पुण्यात रेकी केली होती. राणाने हेडली आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक मुदतही पुरवली होती. राणाला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने हल्याच्या मागे कोण होते याची सत्य माहिती मिळणार आहे.
हेही वाचा :
रॉ ने पाकिस्तानात हत्या घडवल्याचा वॉशिंग्टन पोस्टचा दावा