महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया सुनील यादव याची अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे गोळ्या झाडून हत्या केली. सुनील पाकिस्तानातून ड्रग्जची खेप संपूर्ण जगभर पुरवत होता. दोन वर्षापूर्वी बनावट पासपोर्ट बनवून तो भारतातून अमेरिकेला पळाला होता. तो अबोहर फाजिल्काचा रहिवासी होता. लॉरेन्स बिष्णोई गँगने सुनील यादवच्या हत्येची जबादारी घेतली आहे. (Goldy Brar)
सुरवातीला सुनील यादव हा लॉरेन्स गँगचा सदस्य होता. त्याने ड्रग तस्करीत लक्ष घालून आपला व्यवहार वाढवला होता. तो मोठा ड्रग माफिया बनला. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत होता. सुरवातील दुबई त्याच्या व्यवसायाचे प्रमुख केंद्र होते. त्यानंतर तो अमेरिकेतून व्यवसायाची सुत्रे हालवत होता. राजस्थान पोलिसांनी त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. सुनील यादवचे दुसरे नाव गोली वरयाम खेडा आहे. राजस्थान पोलिसांनी त्याला गंगानगर येथील पंकज सोनीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक केली होती. (Goldy Brar)
सुनील यादव याचा कॅलिफोर्नियात काटा काढण्यात आला. रोहित गोदारा ने त्याच्या हत्तेची जबाबदारी घेतली आहे. त्याने सोशल मिडियावर या संदर्भात पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये असला उल्लेख आहे की, कॅलिफोर्निया येथील घर क्रमांक ६७०६ माउंट एलबर्स व्हाई अमेरिका येथे सुनील यादव उर्फ गोलिया विराम गेडा याची हत्या झाली असून त्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. सुनीलने पंजाब पोलिसांच्या मदतीने अंकित भादूचा एनकाउंटर केला होता. त्याचा बदला आम्ही घेतला आहे. अंकित भादुच्या एनकाउंटरमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचा बदला घेतला जाईल. सुनील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंजाब, हरियाणा, राजस्थानमधील युवकांना ड्रग्ज देऊन बरबाद केले आहे. गुजरातमधील ३०० किलो ड्रग्ज पकडले त्यामध्ये सुनील यादवचा हात होता. अंकित भादूच्या हत्येत त्याचा हात असल्याने तो अमेरिकेत पळाला होता.
हेही वाचा :