कागल; प्रतिनिधी : लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी म्हणून कागलची ओळख आहे. विधानसभेच्या रणधुमाळीत राजर्षी शाहू महाराजांचे थेट वारसदार असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कुटुंबीयांचा प्रचारातील झंझावात हा तालुक्यातील मतदारांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे, विरेंद्रसिंह घाटगे, अखिलेशसिंह घाटगे, श्रेयादेवी घाटगे, यश घाटगे आघाडीवर असल्याचे दिसते. त्यामुळे समरजित यांच्या विजयासाठी घाटगे कुटुंबच दमदार प्रचारात रमले असल्याच्या भावना जनतेतून व्यक्त होत आहेत. (Samarjit Ghatge)
घाटगे कुटुंबीयांच्या या प्रचारात महिला, शेतकरी, युवक, युवती, अबालवृद्धांचा मिळत असलेला प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू कारखान्याच्या माध्यमातून जनतेचा उंचावलेला आर्थिक स्तर, गेल्या नऊ वर्षांपासून समरजित घाटगे यांनी विविध विकासकामांच्या माध्यमातून तालुक्यात केलेली विकासकामे आणि मतदारसंघाबाबतचे त्यांचा दूरदृष्टी दारोदारी जाऊन मतदारांना पटवून सांगत आहेत.
राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने महिलांचे स्वावलंबन, आरोग्य शिबिरे घेणे, महिला आणि युवतींना प्रशिक्षण तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम नवोदिता घाटगे यांनी केले आहे. त्यांनी केलेले काम आणि ठेवलेला संपर्क पाहता सर्वसामान्यांमध्ये एक भावनिक नाते निर्माण झाले आहेत. सर्वसामान्यांना त्या आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतात. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सध्या सर्वत्र सुगीचे दिवस असल्याने लोक शेतीच्या कामांत व्यस्त आहेत. याची जाणीव ठेवून घाटगे कुटुंबीय प्रत्यक्ष वाड्या-वस्त्यांवर, शेतात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. समाजातील सर्वच स्तरातील जनतेचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. ‘यंदा परिवर्तन करायचंय,’ अशा भावना मतदारातून ऐकायला मिळत आहेत.
कुटुंबातील सदस्य
पिंपळगाव खुर्दमधील पंचायत समितीच्या माजी सदस्य उल्का तेलवेकर म्हणाल्या, समरजितराजे आमच्या कुटुंबीयांतील एक सदस्य आहेत. उच्चशिक्षित आणि भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांना लागलेला नाही. समाजउभारणीचे त्यांचे स्वप्नही आदर्शवत आहे. माता भगिनी, आबालवृद्धांचा मान-सन्मान हा तर त्यांच्यावर झालेला संस्कारच आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत तालुक्यातील तमाम जनता नक्की पाठवेल